सैनिकाचं भावविश्व उलगडणारा 'मेजर'

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचं जीवन चरित्र उलगडताना त्यांचा शालेय जीवन, वैवाहिक आयुष्य, त्यांचा एनएसजीच्या ट्रेनींग ऑफिसर बनणं ते दहशतवादयांना यमदसनी धाडताना आलेल्या संकटावर मात करत परिस्थितीला हुशारीनं सांभाळण्याची त्यांची ती लकब अदिवी शेष अभिनेत्यानं हुबेहुब साकारली आहे.
major
Published on: 
Updated on: 

लहानपणापासूनच फक्त देशभक्तीची भावना असलेल्या आणि सैन्यात भरती व्हायचं स्वप्न उराशी बाळगलेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनाचं चित्रण म्हणजे, 'मेजर'. त्यांच्या बालपणापासून, वैवाहिक जीवन ते ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडोच्या कमांडिंग ऑफिसरपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यादरम्यान त्यांनी ताजमहाल पॅलेस हॉटेलमधे दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांचे प्राण कसे वाचवले आणि दहशतवाद्यांशी चार हात करताना स्व:ताच्या प्राणाची आहुती दिली, याचं अचूक चित्रण केलय. तेलुगु चित्रपटाचे दिग्दर्शक शशी किरण यांनी दिग्दर्शिक केलेल्या या चित्रपटात देशाबद्दल प्रेम आणि त्यागाची भावना अतिशय उत्कटपणे रेखाटली आहे. चित्रपटाचे संवाद अक्षत शर्मा यांनी लिहीले आहे. एक सैनिक मुलगा, पती असूनही आपल्या देशाला सर्वात आधी महत्व देणारा सच्चा सैनिकाच्या भूमिकेसाठी अभिनेता अदिवी शेष किती पर्फेक्ट आहे असं त्याचा अभिनय पाहिल्यावर प्रेक्षकांना वाटलं तर काही वावगं ठरणार नाही. मराठी - हिंदी सिनेसृष्टीत नावाजलेले अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरकर यांची मुलगी सई मांजरेकरनेही महाविदयालयीन जिवनापासून ते वैवाहिक जीवन त्यात सैनिक पत्नीच्या वाट्याला आलेलं एकाकी पडद्यावर आयुष्य अचूक साकारलयं. यासोबतच अष्टपैलू अभिनेता प्रकाश राज आणि अभिनेत्री रेवती यांनी सैनिकाच्या पालकांची भूमिका साकारून त्यांच्या कुटुंबाचं वास्तव भावनिक रित्या सादर केलयं. अभिनेता प्रकाश राज आणि अभिनेत्री रेवती यांच त्यांच्या मुलावरचं प्रेम आणि त्याला गमावल्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरची हतबलता पाहून प्रेक्षकांना डोळ्याच्या कडा पाणावतातचं.

चित्रपटाची कथा आणि पटकथेची सांगड घालण्यात दिग्दर्शकाला यश आलयं. चित्रपटाचं कॅमेरावर्क, ड्रोनशूटचा केलेला योग्य वापर, कलाकारंचा अभिनय आणि तांत्रिक बाजू यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. तर, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचं जीवन चरित्र उलगडताना त्यांचा शालेय जीवन, वैवाहिक आयुष्य, त्यांचा एनएसजीच्या ट्रेनींग ऑफिसर बनणं ते दहशतवादयांना यमदसनी धाडताना आलेल्या संकटावर मात करत परिस्थितीला हुशारीनं सांभाळण्याची त्यांची ती लकब अदिवी शेष अभिनेत्यानं हुबेहुब साकारली आहे. तर, संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणाची भूमिका साकरणारा साकारलेली बाल कलाकारही प्रेक्षकांच्या लक्षात राहते.