संजय लीला भन्साळी () हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. संजय लीला भन्साळी हे ऐतिहासिक आणि सुपरहिट चित्रपटांसाठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहेत. त्याच्या आगामी हीरामंडी () या वेबसिरीजमधून तो डिजिटल पदार्पण करणार आहे. हिरामंडीचा फर्स्ट लूक १८ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे, जो सोशल मीडियावर () व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर ‘हीरामंडी’च्या फर्स्ट लूकची जोरदार चर्चा आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याचं लवकरच ओटीटी विश्वात आगमन होणार आहे. ‘हीरामंडी’ वेब सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत. या वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहगल यांच्या मुख्य भूमिका आहेत. सर्व अभिनेत्रींचे एकाच स्टाईलचे मधले पिवळ्या रंगाच्या रॉयल आउटफिट्समध्ये नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेत आहेत. लवकरच ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
नेटफ्लिक्सच्या अधिकृत ट्विटर पेजवरून फर्स्ट लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “संजय लीला भन्साळी यांची आणखी एक जादूई दुनिया, एक वेगळंच युग आणि एक वेगळाच काळ ज्याचा भाग होण्यासाठी आपण वाट पाहतोय. हीरामंडीच्या या सुंदर आणि रंजक जगताची एक झलक! लवकरच तुमच्या भेटीला.” या व्हिडीओमध्ये तो काळ दाखवला आहे जेव्हा वेश्या या राण्यांप्रमाणे आयुष्य जगत असत.
संजय लीला भन्साळी म्हणाले की, चित्रपटांच्या तुलनेत वेब सीरिज बनवण्यासाठी त्यांना दुप्पट वेळ लागला. ते म्हणाले की, मालिका बनवताना जर तुमची कोणतीही शॉर्ट चुकली तर तुम्हाला पुन्हा स्क्रिप्टकडे जावे लागेल. वेब सीरिजना चित्रपट बनवण्यासाठी लागणारा वेळ दुप्पट लागतो. वेब सिरीज बनवताना पूर्ण लक्ष द्यायला हवे. हिरामंडीत मी माझे सर्वोत्तम दिले असल्याचे त्यांनी सांगितले.