(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
शबाना आझमी यांनी १८ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटात आपला ७५व्या वाढदिवस साजरा केला. बोनी कपूर यांनी त्यांच्यासाठी एक भव्य पार्टीचं आयोजन केलं. या सोहळ्यात ऋतिक रोशन, सबा आजाद, सोनू निगम, आणि करण जोहर सारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. “शबाना आझमीच्या ७५व्या जन्मदिवसाच्या खास पार्टीत रेखा, माधुरी दीक्षित आणि विद्या बालनसोबत ‘कैसी पहेली जिंदगानी’ गाण्यावर रोमांचक डान्स, सोशल मीडियावर वायरल झाला असून शबाना आझमी यांचा हा खास आणि उत्साही डान्स पाहून त्यांचे फॅन्स आणि पार्टीतील इतर कलाकार ही आनंदित झाले. सोशल मीडियावर शबानाच्या डान्सचा खूप चर्चाही होत आहे.
पहिल्याच भूमिकेनं जिंकलं मन, जान्हवीची सिनेविश्वातील एंट्री साऱ्यांनाच भावली
शबाना आझमी आपल्या वाढदिवशी पती जावेद अख्तर यांच्यासोबत रोमँटिक डान्स करताना दिसून आल्या.फरहान अख्तरदेखील आपल्या आई-वडिलांचा रोमँटिक डान्स एन्जॉय करताना दिसून आला. आपल्या फोनमध्ये त्याने हे क्षण कैद केले. शबाना आझमी आणि जावेद अख्तर त्यांच्या परफॉर्मन्सने संपूर्ण माहोल रंगतदार केला. या डान्सचे काही क्षण सर्व सेलिब्रिटींनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत.
प्रियाच्या निधनानंतर शंतनु हळू-हळू सावरतोय, 15 दिवसांनी मालिकेत झाली एन्ट्री…
शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचा फराह खानने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.ज्यामध्ये फराह खानने लिहिले आहे
“तुम्ही आता ७५ वर्षांचे झाल्या आहात, शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव करो की तुम्ही दोघं नेहमी असेच तरुण राहा.चाहते जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर भरभरून प्रेम करत आहेत.” अस कॅप्शन लिहित फराह खानने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत.