
sukumar, abhishek agrwal, vivek agnihotri
‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) आणि ‘द ताश्कंद फाइल्स’ (The Tashkent Files) अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक, विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी आपल्या खास शैलीने चित्रपट निर्माण करून सर्वांना थक्क केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. तसेच त्यांच्या कामगिरीमुळे प्रेक्षकांकडून त्यांना प्रशंसा मिळत असून, प्रेक्षक त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी नेहमीच उत्सुक असतात. अशातच, त्यांनी ‘पुष्पा’चे (Pushpa) दिग्दर्शक सुकुमार आणि ‘द काश्मीर फाइल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल (Abhishek Agrawal) यांच्याशी हातमिळवणी करून त्यांच्या आगामी मोठ्या प्रोजेक्टचे संकेत दिले आहेत.
Uniting India with cinema.
Details soon. Guess? Sukumar (Director, #Pushpa) +
Abhishek Agrawal (Producer, #TheKashmirFiles) +
Yours Truly (#TheKashmirFiles) pic.twitter.com/4eUd4DYbQ5 — Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 4, 2022
अलीकडेच विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार आणि ‘द काश्मीर फाइल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे.
[read_also content=”सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये रिद्धी डोगराची एन्ट्री https://www.navarashtra.com/entertainment/riddhi-dogra-to-work-for-tiger-3-of-salman-khan-nrsr-341639/”]
तिन्ही लोकप्रिय सिनेनिर्माते एका प्रकल्पासाठी एकत्र आले आहेत ही संपूर्ण देशासाठी नक्कीच विशेष बाब आहे. जिथे विवेक अग्निहोत्री ‘द ताश्कंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या दमदार चित्रपटांसाठी ओळखले जातात, तिथेच निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘कार्तिकेय 2’सारखे चित्रपट दिले आहेत. तसेच, सुकुमारने त्यांच्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा: द राइज’सह देशभर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.