nanda khare
पुणे: ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे (Nanda Khare Pased Away) यांचं वयाच्या ७६व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यामध्ये (Pune) त्यांचं निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. नंदा खरे यांच्या निधनामुळे साहित्य विश्वामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
[read_also content=”राज्यात दिवसभरात २५१५ नव्या रुग्णांची नोंद https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-corona-update-2515-new-patients-registered-in-state-nrsr-307006.html”]
नंदा खरे याच नावाने अनंत खरे साहित्य लेखन करायचे. त्यांचं लेखन खूप अभ्यासपूर्ण असायचं. त्यांची ‘अंताजींची बखर’ ही कांदबरी खूप गाजली होती. ‘उद्या’ नावाच्या कादंबरीसाठी त्यांना २०२० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो त्यांनी नाकारला होता. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं असं म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. नुकतीच त्यांची ‘नांगलल्यावीन भूई’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. नंदा खरे यांनी मुंबई आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर अभियंता म्हणून कामही केलं आहे.
नंदा खरे यांचे साहित्य – वीसळे पन्नास, वारुळपुराण, कहाणी मानव प्राण्यांची,अंताजीची बखर नांगलल्यावीन भूई