• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Artist Are Honoured In Sanskrutik Kaladarpan Award Night Nrsr

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोह‌ळ्यात ‘माईघाट’ने मारली बाजी, ‘इबलीस’ नाटकाला सर्वात जास्त पुरस्कार

सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार सोहळ्यात (Sanskrutik Kaladarpan Awards) यंदाचा ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) आणि अभिनेते डॉ. विलास उजवणे (Vilas Ujavane) यांना प्रदान करण्यात आला तर प्रभाकर सावंत (गोट्या सावंत) यांना ‘कर्मयोगी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

  • By साधना
Updated On: Jun 09, 2022 | 04:07 PM
sanskrutik kapadarpan kalagaurav award to usha nadkarni
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी कला क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांना चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने (Sanskrutik Kaladarpan Awards) गौरवण्यात येते. नुकताच हा दिमाखदार पुरस्कार सोहळा मुंबईत (Mumbai) पार पडला. यावेळी कला क्षेत्रात विविध विभागात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यंदाचा ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) आणि अभिनेते डॉ. विलास उजवणे (Vilas Ujavane) यांना प्रदान करण्यात आला तर प्रभाकर सावंत (गोट्या सावंत) यांना ‘कर्मयोगी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

sanskrutik kaladarpan dance performance

महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या या शानदार सोहळ्याची सुरुवात गणेशवंदनाने झाली. सोहळ्यात स्वानंदी टिकेकर आणि सुयश टिळक यांच्या निवेदनाने रंगत आणली. तर कलाकारांच्या नृत्याने आणि विनोदी स्किटने या सोहळ्याला चारचाँद लागले. या वेळी नाटक विभागात, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ मंगेश कदम ( आमने सामने) आणि वैभव मांगले (इबलीस) यांना विभागून देण्यात आले तर याच विभागातील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार अभिनेत्री समिधा गुरू यांना देण्यात आला.

चित्रपट विभागातील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ अंकुश चौधरी आणि संदीप पाठक यांना विभागून देण्यात आला, तर उषा जाधव हिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार देण्यात आला .नीरज शिरवाई यांना नाटक विभागात ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन’ तर चित्रपट विभागात अनंत महादेवन यांना ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन’ हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात ‘इबलीस’ या नाटकाने सर्वात जास्त पुरस्कार मिळून बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट नाटकाचा मानही त्यांनीच पटकावला आहे तर चित्रपट विभागात ‘माईघाट’ या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले असून हा ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ ठरला आहे आहे.

sanskrutik kaladarpan award

कलागौरव पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. विलास उजवणे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या की , “आज प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच मी इथे उभा आहे. शुद्ध आणि स्पष्ट बोलणाऱ्यांमध्ये माझं नाव घेतलं जायचं. परंतु आता या आजारपणामुळे माझ्या बोलण्यावर त्याचा परिणाम झाला आहे. या काळात मला माझ्या कुटुंबीयांनी भक्कम आधार दिला. आज या पुरस्काराने मला गौरवण्यात आलं आहे, याचा आनंद आहेच. परंतु हा पूर्णविराम नसून ही माझी आता सेकंड इंनिंग सुरु झाली आहे. मी लवकरच पुन्हा येईन. ”

vilas ujavane

कलागौरव पुरस्काराने गौरवल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “आजवर मी जे काम केले त्यात निर्माता, दिग्दर्शक, सहकलाकार या सगळ्यांचीच मला साथ लाभली. परंतु इथे मी पडद्यामागील कलाकारांचे विशेष आभार मानेन. माझ्या या प्रवासात त्यांचे सहकार्यही तितकेच मोलाचे आहे. निर्माता, दिग्दर्शक यांच्यामुळे या भूमिका मिळतात, परंतु या भूमिका मिळायला नशीबही तितकेच बलवत्तर लागते. हा पुरस्कार मिळाला म्हणजे मी निवृत्त झाले असं नाही. मी अजिबात थकलेली नाही. या पुरस्काराने मला अधिक जोमाने काम करण्याची स्फूर्ती मिळाली आहे.”

usha nadkarni at sanskrutik kala darpan

‘कर्मयोगी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलेले गोट्या सावंत म्हणतात, “हा माझा पहिलाच पुरस्कार आहे, त्यामुळे विशेष आनंद आहे. आशा व्यक्त करतो कदाचित ही पुरस्कार मिळण्याची सुरुवात असेल.”

sanskrutik kaladarpan awards night

या सोहळ्याला विजय कदम, मकरंद देशपांडे, विजय गोखले, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, अंकुश चौधरी, भार्गवी चिरमुले, मंगेश कदम, राजेश देशपांडे, संदीप पाठक, प्रसाद खांडेकर, आदर्श शिंदे, सौरभ गोखले, रुपाली भोसले, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे ,सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अनंत महादेवन, मंगेश बोरगावकर, विजय पाटकर यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण २६ जून रोजी ‘फक्त मराठी’ वर होणार आहे.

Web Title: Artist are honoured in sanskrutik kaladarpan award night nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2022 | 04:04 PM

Topics:  

  • Entertainment Awards

संबंधित बातम्या

‘नॅशनल अ‍ॅवॉर्ड पाहिजे का?’ मंत्रालयातून किशोर कुमारांना एक फोन…करिअरचा पहिला पुरस्कार पण बिघडला सर्व खेळ!
1

‘नॅशनल अ‍ॅवॉर्ड पाहिजे का?’ मंत्रालयातून किशोर कुमारांना एक फोन…करिअरचा पहिला पुरस्कार पण बिघडला सर्व खेळ!

‘झी नाट्य गौरव’मध्ये दिवंगत अतुल परचुरेंच्या रुपात आला ‘हा’ अभिनेता, प्रेक्षकांना अश्रू अनावर
2

‘झी नाट्य गौरव’मध्ये दिवंगत अतुल परचुरेंच्या रुपात आला ‘हा’ अभिनेता, प्रेक्षकांना अश्रू अनावर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक

कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी; अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी; अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक

सरकार आता रिअल-मनी गेम्सवर बंदी घालण्याच्या तयारीत, बुधवारी सादर केले जाईल विधेयक

सरकार आता रिअल-मनी गेम्सवर बंदी घालण्याच्या तयारीत, बुधवारी सादर केले जाईल विधेयक

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.