वयाच्या ९२ व्या वर्षी जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी अखरेचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांनी संगीत विश्वात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी केवळ मराठीच नाहीतर बॉलिवूड आणि संपूर्ण संगीत क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटला होता. मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू इत्यादी वेगवेगळ्या भाषेंमध्ये त्यांनी गाणी गायली होती. आशाताई त्यांच्या गायनासोबतच फॅशनमुळे सुद्धा फेमस होत्या. बदलत्या काळानुसार त्यांनी स्वतःच्या फॅशन आणि स्टाईलमध्ये सुद्धा अनेक बदल केले. चला तर जाणून घेऊया त्यांची आगळी वेगळी फॅशन. (फोटो सौजन्य – pinterest)
Asha Bhosle यांच्या स्टाईलचा प्रवास! काळानुसार स्वतःला बदलत निर्माण केली आगळी वेगळी फॅशन

करिअरच्या सुरुवातीला आशा भोसले साध्या साड्या, हलके दागिने आणि नैसर्गिक लूकमध्ये दिसत असत. त्याच काळात त्यांनी हिंदी, मराठी अशा विविध भाषांमधील गाणी गायला सुरुवात केली होती.

70-80 चा काळात त्यांनी थोडा ग्लॅमरस लूक स्वीकारला. स्टायलिश साड्या, बिंदी, आणि आकर्षक हेअरस्टाईल करून संपूर्ण फॅशनमध्ये बदल केला.

वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळी क्लासिक साडी स्टाईल, कांजीवरम, सिल्क आणि एम्ब्रॉयडरी साड्यांमध्ये त्यांचा क्लासिक आणि रॉयल लूक नेहमीच उठून दिसायचा.

आशा ताईंना मराठमोळ्या दागिन्यांसोबतच मोती, डायमंडचे दागिने परिधान करायला आवडायचे. ज्वेलरी आणि सिग्नेचर लूकमोठी बिंदी, गळ्यातील दागिने आणि स्लीक हेअरस्टाईल ही त्यांची ओळख बनली.

आजचा टाइमलेस एलिगन्समध्ये वय वाढलं तरी त्यांची स्टाईल कायम एलिगंट सिंपल पण रॉयल, क्लासिक आणि ग्रेसफुल होती. वयाच्या ९२ व्या वर्षीसुद्धा त्यांचे सौंदर्य तरुणाईला लाजवेल असे होते.






