विनेश फोगाटच्या स्वागतासाठी हे दिग्गज झाले सामील! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट मायदेशी परतली आहे. ती दिल्ली विमानतळावर उतरताच टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने तिचे जंगी स्वागत केले. त्याचबरोबर तिने तिच्या मित्र परिवाराला आणि आईला पाहून विनेश फोगाट भावुक होताना दिसली. यावेळी विनेश फोगाटच्या स्वागतासाठी अनेक भारतीयांनी विमानतळावर गर्दी केली होती. एवढेच नव्हे तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी विनेश फोगाटच्या विशेष रॅलीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर विनेश फोगाटच्या स्वागतासाठी काही दिग्गज खेळाडूंनी सुद्धा हजेरी लावली होती या छायाचित्रांवर एकदा नजर टाका.
विनेश फोगाट दिल्ली विमानतळावर पोहोचताच करण्यात आले जंगी स्वागत - फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारे शुटर गगन नारंग यांनी दिल्ली विमानतळावर कुस्तीपटू विनेश फोगाटची भेट घेऊन फोटो शेअर केला आहे. फोटो सौजन्य - गगन नारंग X अकाउंट
भारताचा स्टार बॉक्सर आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंह याने सोशल मीडियावर विनेशला मोठ्या प्रमाणात साथ दिली, त्याचबरोबर तो तिच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर सुद्धा दिसला. फोटो सौजन्य - विजेंदर सिंह X अकाउंट
साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे तिचे जवळचे मित्र आहेत त्यांनी तिच्या समर्थानात तिला साथ दिली आहे, या दोघांना पाहून ती भावुक होताना दिसली. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विनेश फोगाटच्या स्वागतासाठी तिची आई देखील विमानतळावर आली होती यावेळी तिच्या आईच्या चेहऱ्यावर मोठे हास्य पाहायला मिळाले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विनेश फोगाटच्या स्वागतासाठी साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या दोघांनी मोठ्या रॅलीचे आयोजन केले आहे, यासाठी दिल्लीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. फोटो सौजन्य - सोशल मीडिया