‘गणपती तू गणपती तू’ गाणं नव्या बाजात प्रेक्षकांच्या भेटीला
राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र (Savaniee Ravindra) तिच्या युट्यूब चॅनलवर गणेशोत्सव स्पेशल एक अनप्लग कव्हर सॉंग 'गणपती तू, गुणपती तू' (Ganpati Tu Ganpati Tu Song) घेऊन आली आहे. हे गाणं जगदीश खेबूडकरांनी गीतबद्ध केलेलं असून याचं संगीत यशवंत देव यांचं आहे. 'मंत्र्यांची सून' या चित्रपटातील हे गाणं डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आहे. हे गाणं एका नव्या बाजात सावनीनं आपल्यासाठी आणलं आहे.