Priyadarshini Indalkar Look: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदालकर. आपल्या अचूक टायमिंगने सर्वांना निखळ हसायला लावणाऱ्या या अभिनेत्रीचा नखराही कमाल आहे. नुकतेच तिने कॉटनच्या युनिक आणि आर्टिस्टिक हाती पेंट करण्यात आलेल्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले असून तिचा हा लुक कमालीचा व्हायरल होतोय. पाहा प्रियदर्शिनीचा हा लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आधुनिकता आणि पारंपरिकता याचा सुंदर मेळ नेहमीच प्रियदर्शिनी आपल्या लुकमधून चाहत्यांना दाखवत असते
गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये प्रियदर्शिनीचे सौंदर्य खुलले आहे. वर गुलाबी ब्लाऊजप्रमाणे डिझाईन कऱण्यात आले आहे
गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या या फ्रॉकवर हँडपेंट करण्यात आले असून आर्टिस्टिक बाईचे चित्र काढण्यात आले आहे
कुरळ्या केसांमध्ये सुंदरसे पांढरे फूल माळून प्रियदर्शिनीने आपला लुक पूर्ण केलाय.तर तिचे नैसर्गिक कुरळे केस अधिक आकर्षक दिसत आहेत
कपाळावर लहानशी टिकली आणि हसताना पडलेली गालावरची खळी हे चाहत्यांच्या हृदयात नक्कीच घर करतेय
मॅचिंग चप्पल आणि न्यूड मेकअपमध्ये प्रियदर्शिनीने आपला हा लुक पूर्ण केलाय. तुम्हीही तिच्या या लुकवरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता