Fashion Tips: महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहचलेली आणि आपल्या अभिनयाने, सौंदर्याने आणि गालावरच्या खळीने सर्वांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदालकर सध्या काश्मिरमध्ये फिरतेय. तिने काही क्लासी फोटो शेअर केले असून पाहा तिचा क्लासी लुक
प्रियदर्शिनी इंदालकरने आपल्या अभिनयाने, परफेक्ट कॉमेडी टायमिंग आणि सौंदर्याने सर्वांना आपलंसं केलं आहे. इतकंच नाही तर तिची फॅशनही कायम ऑनपॉईंट असते. प्रियदर्शिनी इंदालकर नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे लुक्स तिच्या चाहत्यांना खूपच आवडतात. तिच्या फोटोंवर अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
नुकतीच प्रियदर्शिनी काश्मीरमध्ये गेली असून तिने तिथले काही फोटो शेअऱ केले आहेत. यामध्ये अत्यंत साधी तरीही स्टायलिश, एलिगंट अशी तिची फॅशन दिसून आली आहे. तिचा हा लुक नक्की कसा आहे यावर एक नजर टाकूया (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
[caption id="attachment_546196" align="alignnone" width="1200"] प्रियदर्शिनीने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस घातला असून यामध्ये आपली फिगर फ्लाँट केली आहे. फुल हँड स्लीव्हज असणारा हा ड्रेस अत्यंत स्टायलिश असून प्रियदर्शिनी यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.[/caption]
[caption id="attachment_546202" align="alignnone" width="1200"]
यासह तिने केशरी रंगाचे कानात टॉप्स घातले असून कोणत्याही प्रकारचे इतर दागिने कॅरी केलेले नाहीत. तर ऑन गो फॅशन लुक कॅरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.[/caption]
[caption id="attachment_546203" align="alignnone" width="1200"]
केसांचा अंबाडा बांधत तिने मेस्सी बन लुक ठेवलाय. बाहेर फिरायला गेल्यानंतर निसर्गाची मजा अधिक घेण्यावर तिने भर दिल्याचे दिसून येत आहे.[/caption]
[caption id="attachment_546204" align="alignnone" width="1200"]
दरम्यान या क्लासी एलिगंट थाय स्लिट बॉडीफिट बॉडीकॉन ड्रेससह तिने कोणताही मेकअप केलेला नाही. नॅचरल लुकमध्ये प्रियदर्शिनीचे सौंदर्य अधिक खुलून आल्याचे दिसून येत आहे.[/caption]
[caption id="attachment_546206" align="alignnone" width="1200"]
यावेळी तिने काश्मीरमधील काही ठिकाणांना भेट दिली असून स्वतःसाठी वेळ काढला आहे आणि ‘माझा आवडता छंद’ असं कॅप्शन देत वाचन, लेखनासाठी वेळ दिल्याचे दिसून येत आहे.[/caption]