अभिनेत्री निवेदिता सराफ यांना आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. त्यांचा अभिनय तर दमदार आहेच, पण त्यांचं फिटनेस पण सगळ्यांना थक्क करणारं आहे. वयाच्या 61 व्या वर्षीही त्या इतक्या फ्रेश आणि एनर्जेटिक दिसतात की विश्वासच बसत नाही. याचं कारण आहे त्यांचा कडक आहार आणि शिस्तबद्ध आयुष्य. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी स्वतःचा पूर्ण डाएट प्लान सांगितला आहे. तो ऐकून तुम्हाला पण वाटेल की फिट राहण्यासाठी किती पथ्य पाळावी लागतात.
Nivedita Saraf Secret Diet Plan: (फोटो- सोशलमीडिया)

शूटिंग असेल तर त्या सकाळी 8-8.30 ला घर सोडतात पण त्याआधी पूर्ण जेवण करूनच जातात.दिवसभरात काय खातात?सकाळी त्या गवती चहा, तुळस, पुदिना, आलं, ज्येष्ठमध, आवळा पावडर आणि दालचिनी यांचा काढा पितात.दिवसभर त्या चहा-कॉफी घेत नाहीत. फक्त दुपारी 4 वाजता एक कप चहा घेतात. तो पण साधा नाही. त्यांनी लॅक्टोज पूर्ण बंद केलं आहे. म्हणजे दुधाचा चहा नाही. कॉफी प्यायची असेल तर ओट्स मिल्क किंवा बदामाच्या दुधाची घेतात.

अशोक सराफ यांनीच त्यांना नुसती डाळ, भाज्या आणि उसळ खायला शिकवलं आहे.संध्याकाळी 99% त्या कार्ब्स खात नाहीत. फक्त घरी बनवलेलं सूप घेतात. बाहेरचं पॅकेट सूप किंवा पॅकेज्ड फूड त्या अजिबात खात नाहीत. त्या म्हणाल्या, "मी स्पोर्ट्स मेडिसिन शिकल्यापासून पॅकेज्ड फूड, कोल्ड स्टोरेजमधलं अन्न पूर्ण बंद केलं आहे. माझ्या घरात तुम्हाला साखरेचं गोड काहीच मिळणार नाही."त्यांचं म्हणणं आहे की खाणं-पिणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मेडिटेशन आणि प्रार्थना पण महत्वाची आहे. पोट साफ असणं आणि वेळेवर खाणं यामुळेच त्वचा आणि केस चांगले राहतात.खरंच, निवेदिता सराफ यांचा हा फिटनेस मंत्र खूप काही शिकवून जातो.

ब्रेड सुद्धा त्या बाहेरचा आणत नाहीत. खपली गव्हापासून घरीच ब्रेड बनवतात.जेवणात रोज एक पालेभाजी असतेच. त्यांना भात खूप आवडतो पण त्या आठवड्यातून फक्त तीन दिवस - गुरुवार, शनिवार आणि रविवार - फक्त 2 चमचे भात खातात. यावरून त्यांचे पती अशोक सराफ त्यांना चिडवतात की "लोणच्यासारखा भात खाते" म्हणून.त्यांनी एक नियम सांगितला की जेवताना दोन प्रोटीन एकत्र खायचे नाहीत.

मधले 16 तास उपवास.त्यामुळे त्यांनी सकाळचा चहा पण बंद केला आहे. चहा ऐवजी त्या एक खास काढा पितात. रात्री जिरे, बडीशेप, ओवा आणि मेथी समप्रमाणात घेऊन 4 कप पाण्यात 4 चमचे भिजत घालतात. सकाळी ते उकळून 2 कप करतात आणि तेच पितात. हा त्यांचा सकाळचा पहिला चहा असतो.

निवेदिता सराफ यांनी सर्वकाही या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्या खाण्यापिण्यात खूप काळजी घेतात.त्या म्हणाल्या, "मी तळलेलं अजिबात खात नाही. रस्त्यावरचं तर सोडाच, पण मी बाहेरचं काहीच खात नाही. कोरोना झाल्यापासून तर आमचं हॉटेलमध्ये जाऊन खाणं पूर्ण बंद झालं आहे. जे खायचं ते घरी बनवलेलंच."त्या इतक्या कडक आहेत की शूटिंगला जातानाही त्या स्वतःचा डबा घेऊन जातात.

त्यांनी एक किस्सा पण सांगितला. त्या म्हणाल्या, "मी जेव्हा 'फर्स्ट क्लास दाबाडे' हा सिनेमा केला तेव्हा मी माझं इंडक्शन शेगडी बरोबर घेऊन गेले होते. तिथे फक्त भाकरी मागायचे. भाकरी-भाजी खायचे आणि रात्रीचं जेवण मी स्वतःच बनवायचे. नुसते पोहे करून खाल्ले तरी चालेल पण घरचंच खायचं."सकाळी 5 वाजता उठून दिवस सुरुत्यांचा दिवस खूप लवकर सुरु होतो. त्या सकाळी 5 वाजता उठतात. उठल्यावर सगळ्यात आधी त्या नामस्मरण करतात. स्वामींचा जप, ओम नमः शिवाय, मंगेशी आणि कुलदैवताचा जप करतात. त्यानंतर त्या मेडिटेशन करतात.

मेडिटेशनबद्दल त्या म्हणाल्या, "माझ्या मेडिटेशनमध्ये एक व्यायाम असतो. जर मी कोणाला दुखावलं असेल तर मी माफी मागते आणि कोणी मला दुखावलं असेल तर मी त्यांना माफ करून टाकते."या नंतर त्या 6 वाजता त्यांच्या मैत्रीण उमासोबत चालायला जातात. रोज 6 किलोमीटर चालतात. 70 मिनिटात हे वॉक पूर्ण करतात आणि घरी आल्यावर स्ट्रेचिंग करतात.16 तासांचं इंटरमिटंट फास्टिंगनिवेदिता सध्या इंटरमिटंट फास्टिंग करतात. यात त्या संध्याकाळी साडे सात वाजता शेवटचं जेवण करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता जेवतात.






