
ग्रीन ब्लाऊजने दिला लुकला खास टच
जांभळ्या साडीवर तिने हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला. त्यामुळे तिचा पूर्ण लुक एकदम उठून दिसतो.
ब्लाऊजची निवडच ठरली गेमचेंजर
नऊवारीला वेगळा लुक द्यायचा असेल तर ब्लाउजची निवड खूप महत्त्वाची असते. प्राजक्ताने निवडलेली ही रंगसंगती लग्न-समारंभासाठी एक छान कल्पना देऊन जाते.
पारंपरिक दागिन्यांनी वाढवली सौंदर्यात भर
नऊवारीचा लुक दागिन्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. नथ, बांगड्या आणि कानातल्यांमुळे तिच्या लुकला शाही थाट आला.
सिंपल मेकअपने पूर्ण केला लुक
साध्या आणि नैसर्गिक मेकअपने तिने हा पारंपरिक लुक पूर्ण केला. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचं नैसर्गिक सौंदर्य जास्त खुलून दिसतं.
सण-समारंभांसाठी घेऊ शकता प्राजक्ताच्या लुकची प्रेरणा
लग्नसराई किंवा सणासाठी काय घालावं, असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो. जांभळी नऊवारी, कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि गजरा हा त्यावर एकदम भारी पर्याय ठरेल.