रतन टाटा यांच्याकडे होत्या 'या' 5 सर्वात महागड्या वस्तू, ज्यांची किंमत होती तब्बल...
उद्योगपती रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी जगाचा निरोप घेतला. ते 86 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. कोट्यवधी रुपयांची संपत्ती असतनाही रतन टाटा अत्यंत साधेपणाने आयुष्य जगत होते.
रतन टाटा यांनी निम्म्याहून अधिक संपत्ती दान केली आहे. पण असे असतानाही त्यांच्याकडे काही महागड्या वस्तू सुद्धा होत्या. ज्यामध्ये फेरारी कार, आलिशान घर आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांच्याकडे डसॉल्ट फाल्कन नावाचे खासगी जेट होते. ज्याची किंमत 224 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.
याच्या व्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे लाल रंगाची फेरारी कॅलिफोर्निया होती. या कारची किंमत 2.82 कोटी रुपये आहे.
रतन टाटा यांच्याकडे क्वॉट्रोपोर्टी मासेराटी नावाची एक सेडान कार सुद्धा होती, ज्याची किंमत 2.12 कोटी रुपये आहे.
रतन टाटा हे कधी-कधी लँड रोव्हर फ्रीलँडरमध्ये सुद्धा प्रवास करत असत. या कारची किंमत 51.35 लाख रुपयांच्या घरात आहे.
या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त रतन टाटा हे मुंबईतील कुलाबा येथील घरात राहत होते. ज्याची किंमत अंदाजे 150 कोटी रुपये होती.