Rekha At Sonakshi Zaheer Wedding: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने २३ जून रोजी रजिस्टर्ड मॅरेज केले. तर त्यांच्या रिसेप्शनला मोठमोठ्या स्टार्सने उपस्थिती लावली होती. मात्र या सोहळ्यात पुन्हा एकदा 69 वयाच्या एव्हरग्रीन रेखासमोर सर्वच फिके पडले. नेहमी साडी नेसणारी रेखा यावेळी मात्र एका वेगळ्यात अवतारात सर्वांसमोर आली. ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला’ अशीच सर्वांची स्थिती होती. पाहा रेखाचा हा कमालीचा लुक (फोटो सौजन्य - RNO Feed)
रेखाने यावेळी व्हाईट ड्रेससह गोल्डन काठ असणारा दुपट्टा ड्रेप केला होता आणि तिचा हा लुक तरूण अभिनेत्रींनाही लाजवणारा ठरला. रेखाच्या सौंदर्यापुढे सगळेच फिके ठरले होते (फोटो सौजन्य - RNO Feed)
रेखाने नेहमीप्रमाणे साडी न नेसता एक मॉडर्न ट्विस्टसह फॅशन कॅरी केली होती. तिच्या उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधले
तिने या वेगळ्या लुकसह ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी घातली होती. बांगड्या, झुमके, नेकलेस आणि केसात मांगटिका असा तिचा नेहमीचा लुक दिसून आला
केसांचा आंबाडा आणि त्यामध्ये गजरे माळायला रेखा कधीच विसरत नाही आणि यावेळीही तिने तशीच हेअरस्टाईल करत आपला ऑरा कायम ठेवला.
रेखाने यासह फ्लुरोसन आणि गोल्डन रंगाचे कॉम्बिनेशन असणारी पोटलीदेखील कॅरी केली होती. तिच्यावरून कोणाचीही नजर हटत नव्हती
ग्रीन रंगाचा मोठा नेकलेसदेखील यावेळी लक्ष वेधून घेत होता. तिने ऑक्सिडाईज्ड आणि फ्लुरोसन असे कॉम्बिनेशन यावेळी मॅच केले होते
नेहमीप्रमाणे रेखाने डार्क मेकअप करत पुन्हा लक्ष वेधले. तिने यावेळी डार्क मरून रंगाची लिपस्टिक लावली होती
गोल्डन हाय हिल्स घालत तिने हा लुक पूर्ण केलाय. रेखाने नव्या अभिनेत्रींना लाजवेल असाच लुक करत पुन्हा आपणच या जगाची राणी आहोत दाखवून दिले आहे