गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सगळेच उत्सुक आहेत. सणावाराच्या दिवसांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर साड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करतात. बऱ्याचदा साड्यांची खरेदी झाल्यानंतर लुक पूर्ण करण्यासाठी कोणत्या डिझाईनचे कानातले परिधान करावे, यात मोठा गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे यंदाचा फेस्टिव्ह लुक पूर्णपणे करण्यासाठी रोजच्या कानातल्यांऐवजी मोत्याचे सुंदर इअरकफ खरेदी करावे. इअरकफ घातल्यानंतर कान भरगच्च आणि सुंदर दिसतात. चला तर पाहुयात इअरकफच्या सुंदर आणि आकर्षक डिझाईन. (फोटो सौजन्य – pinterest)
गौरी गणपतीच्या सणांसाठी खरेदी करा मोत्याचे सुंदर इअरकफ! भरगच्च दागिन्यांनी लुक दिसेल उठावदार

बाजारामध्ये ३०० ते ५०० रुपयांच्या आतमध्ये सुंदर इअरकफ उपलब्ध आहेत. मोत्याचे इअरकफ नऊवारी, सहावारी साडी किंवा ड्रेसवर सुद्धा अतिशय आकर्षक दिसतात.

अनेकांना नाजूक साजूक डिझाईनचे कानातले परिधान करायला खूप जास्त आवडतात. अशावेळी या डिझाईनचे एअरकफ तुम्ही खरेदी करू शकता. हे एअरकफ केवळ साडीवरीच नाहीतर कोणत्याही लुकसाठी उत्तम आहेत.

मोत्याचे दागिने सर्वच रंगाच्या कपड्यांवर शोभून दिसतात. त्यामुळे इतरांपेक्षा वेगळा आणि हटके लुक हवा असेल तर नथीचे इअरकफ खरेदी करू शकता. नथ हा महाराष्ट्राचा पारंपरिक दागिना आहे.

मोत्यांच्या कळ्या आणि झुमका डिझाईनचे इअरकफ गौरी आवाहनाच्या दिवशी किंवा पूजेच्या पैठणी, नऊवारी साडीवर उठून दिसतील.

मोर-पिंपळपान डिझाईनचे मोगरा इअरकफ कौटुंबिक कार्यक्रमात सिल्क किंवा चंदेरी साडीवर परिधान केल्यास लुक स्टायलिश आणि हटके दिसेल.






