अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि तिच्या सौंदर्यचा नाद नाय करायचा! तिच्या सौंदर्याच्या चर्चा अफाट असतात. ती नेहमीच तिच्या सौंदर्याने तुफान आणते. या वादळात अनेक तरुण आपला जीव देऊन बसतात. प्रेम करून बसतात. अशामध्ये पुन्हा एकदा हे वादळ सोशल मीडियावर पोस्ट झाले आहे.
स्मिता गोंदकरचा ओणम स्पेशल लुक. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

अभिनेत्री स्मिता गोंदकरने तिच्या @smita.gondkar या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये तिने Onam स्पेशल लुक शेअर केला होता. दक्षिण भारताची परंपरा तिने येथे जोपासली आहे.

अभिनेत्रीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये सगळ्यांना ओनमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सोन्याचे दागिने परिधान केले आहेत.

केसामध्ये गजरा माळला आहे. तिचा सौंदर्य पाहून कुणी ही तिच्या रुपाला भाळून जाईल असे ते नयनरम्य सौंदर्य आहे.

अभिनेत्रीला कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव मिळाला आहे. या वर्षावात अभिनेत्री पूर्णतः भिजून गेली आहे आणि जात आहे.






