श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं सणांची चाहूल लागते. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे गौरी गणपती. गणपती बाप्पाच्या आगमनाची मोठ्या आनंद आणि उत्साहात तयारी केली जाते. याशिवाय गणपती सण, लग्नकार्य, कौटुबिंक सोहळा इत्यादी सर्व कार्यक्रमांमध्ये महिला सुंदर नटून थटून तयार होतात. भरजरी किंवा काठपदर साड्यांची खरेदी केल्यानंतर त्यावर नेमके कशा पद्धतीची दागिने घालावे, बऱ्याचदा महिलांना सुचत नाही. पण हेवी दागिन्यांची निवड करण्याऐवजी अतिशय मिनिमल दागिने साडीवर घालावेत. सध्या ट्रेंडमध्ये असलेला इनव्हिजिबल नेकलेस साडीवर किंवा ड्रेसवर सुद्धा अतिशय सुंदर आणि हटके दिसेल. (फोटो सौजन्य – pinterest)
गौरी-गणपतीच्या सणासाठी स्पेशल दागिना! ‘या’ Invisible Necklace डिझाईन्स वरून हटणार नाही नजर

सणासुदीच्या दिवसांमध्ये साडी, ड्रेसवर मिनिमल लुक हवा असेल तर या डिझाईनचे इनव्हिजिबल नेकलेस नक्कीच ट्राय करा. हे नेकलेस अगदी १०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

नाजूक फ्लोरल डायमंड अँड पर्ल नेकलेस इंडो-वेस्टर्न कपड्यांवर अतिशय सुंदर दिसतो. याशिवाय या डिझाईनचा नेकलेस तुम्ही ऑर्गेंझा, नेट, सॅटिन किंवा पेस्टल शेड्सच्या डिझायनर साड्यांवर सुद्धा घालू शकता.

अँटीक लक्ष्मी पेंडंट कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर अतिशय सुंदर दिसते. पैठणी, कांजीवरम किंवा कोणत्याही खणाच्या साडीवर सुद्धा घालू शकता.

गळ्यात भरगच्च दागिने नको असल्यास या डिझाईनचे सुंदर इनव्हिजिबल नेकलेस परिधान करू शकता. यामध्ये वेगवेगळे पेंडेंट सुद्धा उपलब्ध आहेत.

सणावारांच्या दिवसांमध्ये साडीवरील आणखीनच खुलून दिसण्यासाठी तुम्ही या डिझाईनचे डायमंड पेंडंट असलेले नेकलेस घालू शकता.






