पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच स्त्रिया पायामध्ये पैंजण घालतात. पैंजण घातल्यामुळे पायांच्या सौंदर्यात भर पडते. हा एक पारंपरिक दागिना आहे. पैंजणाला असलेल्या लहान घुंगरांमुळे छान मंजुळ किंवा छुमछुम असा आवाज येतो. बाजारात जाड, पातळ, मध्यम आकाराचे आणि विविध डिझाईनचे पैंजण उपलब्ध आहेत. पारंपरिक डिझाईनचे चांदीचे पैंजण पायात घातल्यानंतर पाय अतिशय सुंदर आणि भरगच्च दिसतात. त्यामुळे केवळ चांदीच्या नाहीतर या वेगवेगळ्या डिझाईनच्या पैंजण तुम्ही पायात घालू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
पायांचे सौंदर्य खुलवतील 'हे' मिनिमल पैंजण डिझाईन! सणसमारंभ आणि रोजच्या वापरासाठी आहेत परफेक्ट

साडी, कुर्ती, अनारकली, लेहंगा घातल्यानंतर त्यावर तुम्ही या डिझाईनचे पैंजण घालू शकता. बारीक बारीक मण्यांची गुंफण आणि मध्यभागी असलेल्या फुलांच्या किंवा कमळाच्या पेंडेंटमुळे पैंजण अतिशय सुंदर दिसतील.

श्रावण, सणवार, पूजा किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा नऊवारी साडीवरील मराठमोळ्या पारंपरिक लुकसाठी तुम्ही या डिझाईनच्या पैंजणाची निवड करू शकता.

बाजारात केवळ चांदीचे नाहीतर मिनाकारी डिझाईनचे पैंजण सुद्धा उपलब्ध आहेत. हे पैंजण साडी किंवा लेहंग्यांवर शोभून दिसतात.

साध्या चेनसोबत छोटंसं फुलाचं पेंडंट किंवा घुंगरू असलेले पैंजण कोणत्याही लुकसाठी उत्तम आहेत. या डिझाईनचे पैंजण तुम्ही कॉटन साडी, लिनेन साडी, साधी कुर्ती किंवा वेस्टर्न मॅक्सी ड्रेसवर सुद्धा घालू शकता.

रोजच्या वापरासाठी नाजूक चैन असलेले पैंजण परफेक्ट आहेत. या पैंजण तुम्ही सोनं किंवा चांदीमध्ये सुद्धा खरेदी करू शकता.