Rahul Gandhi PC: तुमच्या सरकारमधील २०० अधिकारी आमच्या संपर्कात, सगळी माहिती ... राहुल गांधीचा गौप्यस्फोट
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगातील भ्रष्टाचाराविरोधात विरोधी इंडिया आघाडीसह, कॉकरोच जनता पार्टी, ऑल इंडिया स्टुडेंट असोसिएशनसह देशभरातील संघटना विरोधात उतरल्या आहेत.केंद्र सरकारविरोधात झालेली आंदोलने सातत्याने चिरडली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. असे असतानाच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नवा गौप्यस्फोट करत केंद्रातील २०० अधिकारी आपल्या संपर्कात असल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली आहे.
जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त जात नाही, लोकशाही बहाल होत नाही. निवडणूक प्रक्रिया सुधारली जात नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत हिंदुस्तानचा युवा थांबणार नाही. तुम्हाला जे करायंच आहे ते करा, असे खुले आव्हान राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिले आहे. पाच गुन्हेगारांनी हिंदुस्तानाच्या आत्म्यावर आक्रमण केलं आहे. आम्ही मागे हटणार नाही. आम्ही थांबणार नाही कितीही वेळ लागो. असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे.
इंडिया आघडीचा आज बाराखंबा इथे पुन्हा मोर्चा निघत आहे, ज्याला यायचं आहे त्याने बिनधास्त यावं. जो संविधानाची रक्षा करू इच्छितो. कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो. जर तो भाजपचा जरी असेल तरी आम्हाला काही फरक पडत नाही. स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही जातीधर्माचा असो, पत्रकार असो, त्या प्रत्येकाने यावं. आता नरेंद्र मोदींची सगळी कुंडलीच आमच्याकडे आहे. त्यांनाही माहिती आहे आणि आम्हाला माहिती आहे. यात आमचे काहीच महत्त्व नाही, देशाच्या संविधान महत्त्वाचे आहे. देशाची जनता महत्त्वाची आहे. देशाच्या भविष्य महत्त्वाचे आहे. देशाच्या प्रत्येक विरोधी पक्ष, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक युवा ही तुमच्या भविष्याची लढाई आहे. ही तुमच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. यात तुम्हाला सामील व्हायचं आहे. असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
जर कोणी येऊ शकत नसेल तर साडेतीन वाजता तुम्ही आम्हाला समर्थन द्या, जसे शक्य असे तसे समर्थन द्या. असे आवाहन राहुल गांधी यांनी क केलं आहे. संविधान हा आमचा धर्म आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे. हे लोक डरपोक आहेत. त्यांची यंत्रणा आतून कोसळली आहे.
ज्ञानेश कुमारांनी तुम्हाला कोणत्याही प्रकारे, कोणत्याही पद्धतीने संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का, असा सवाल विचारला असता राहुल गांधी म्हणाले, त्यांचे मेसेजेस येत आहेत. ते ही प्रेस कॉन्फरन्स पाहत आहेत. आता त्यांना माझा एकच संदेश आहे, त्यांनी गुन्हा मान्य करावा आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की, तुम्ही मुख्य गुन्हेगार नाही, तुम्ही चुका केल्या आहेत. पण तुम्ही ज्या चुका केल्या आहेत त्यामागचा मास्टमाईड कोण आहे. त्याना आम्ही सोडणार नाही. तुम्ही राजीनामा द्या आणि माघार घ्या, आम्ही तुम्हाला माफ करू. पण आम्हाला माहिती आहे की तुम्हाला मोदी-शहा-डोवाल आणि अदानी यांनी तुम्हाला हे सर्व करण्यासाठी भाग पाडलं आहे. तुमच्यावर किती प्रेशर असेल, याची आम्हाला जाणीव आहे. असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.






