
महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार (Photo Credit - X)
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार
“महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. महायुतीला भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार मानतो,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
Maharashtra stands firmly with development! Grateful to the people of Maharashtra for blessing the BJP and Mahayuti in the Municipal Council and Nagar Panchayat elections. This reflects trust in our vision of people-centric development. We remain committed to working with… https://t.co/X5jmfpb3M8 — Narendra Modi (@narendramodi) December 21, 2025
महाराष्ट्र नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत महायुतीला (महायुती) भरघोस पाठिंबा दिल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो. हा विजय म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठीच्या दृष्टिकोनावर जनतेचा आशीर्वाद आहे. या विजयाबद्दल मी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवींस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि सर्व एनडीए कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. तसेच, भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन!
महाराष्ट्र नगर पंचायत व नगर परिषद के चुनाव में महायुति को प्रचंड समर्थन देने के लिए प्रदेश की जनता का आभार। यह विजय मोदी जी के नेतृत्व में NDA की केंद्र व राज्य सरकार के हर वर्ग के कल्याण के विजन पर जनता का आशीर्वाद है। इस जीत पर मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री… — Amit Shah (@AmitShah) December 21, 2025
शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या निवडणुकांमध्ये ‘असली शिवसेना कोणाची’ याचा फैसला जनतेने केला आहे. महाविकास आघाडीचा एकत्रित आकडा सिंगल डिजिटमध्ये राहिला, तर शिवसेनेचा आकडा त्यापेक्षा अधिक आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिकेतही महायुतीचाच भगवा फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तोच पुढे जाईल,” असे ठामपणे सांगत त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. शिवसेना आता केवळ मुंबई-ठाण्यापुरती मर्यादित नसून चांदा ते बांधापर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी नमूद केले.
“हा टीम भाजपचा विजय” – देवेंद्र फडणवीस
विजयाचा जल्लोष साजरा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला मिळाले नसेल, एवढे मोठे यश भाजपने मिळवले आहे. मी कोणत्याही सभेमध्ये कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही केवळ विकासाची ‘ब्लू प्रिंट’ मांडली आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. हा विजय प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातील टीम भाजपचा विजय आहे.”