

डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा
इंडिया आघाडीला बसला मोठा फटका
जितेंद्र आव्हाड यांनी दिला दुजोरा
NCP Support Delimitation Bill : नवी दिल्ली : परिसीमन विधेयकासंदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाचा शरदचंद्र पवार गट या विधेयकाला पाठिंबा देईल. संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांच्या रणनीतीसाठी ही भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
आज मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकावरून राजकारण तापले आहे. या विधेयकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे. इंडिया आघाडीतील महत्त्वपूर्ण पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोदी सरकारला पाठिंबा देत विधेयकाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.
डिलिमिटेशनला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाठिंबा असल्याच्या माहितीला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला आहे. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले, पवार साहेबांशी माझी या विषयावर यापूर्वीही चर्चा झाली होती. तेव्हा डिलिमिटेशनचा विषयही नव्हता. पण तेव्हा साहेबांनी मला सांगितलं होतं की, डिलिमिटेशन हे कॉन्स्टिट्यूशनल असतं आणि ते करावं लागतं. त्याला काही पर्याय नसतो. आपापले मतदारसंघ बांधायला शिका, कितीदिवस असं चालायचं. ही सगळी आमची अनौपचारिक चर्चा होती, असं यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं.
पुढे आव्हाड म्हणाले की, मी ओपनली सांगतो, साहेब हे माझे दैवत आहेत. माझ्या दैवताची भूमिका जी, तिच माझी भूमिका आहे.
परिसीमन विधेयकाबाबत शरद पवार गटाने काय निर्णय घेतला आहे?
२७ नोव्हेंबर रोजी जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर परिसीमन विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याची माहिती दिली.
परिसीमन विधेयकाबाबत जितेंद्र आव्हाड यांनी कोणती माहिती दिली?
शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष परिसीमन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
परिसीमन विधेयकाबाबत सुप्रिया सुळे यांची भूमिका काय आहे?
सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचा मसुदा अद्याप पाहिला नसल्याचे सांगितले आहे. विधेयकातील तरतुदी तपासल्यानंतरच पक्षाची भूमिका स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे.