• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Ganesh Chaturthi Know The Story Of Jyeshtha Gauri Avahana

ज्येष्ठा गौरी आवाहनाची कथा जाणून घ्या

राज्यभरात 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा विराजमान झाले. महालक्षमींचं आगमण गणेश चतुर्थीच्या चौथ्या दिवशी होणार आहे. यावेळी ज्येष्ठा गौरी आवाहन मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी आहे. राज्यात गौरी गणपतीचा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत. ज्येष्ठा गौरी पूजनाची संपूर्ण कथा.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 09, 2024 | 12:30 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यात गौरी गणपतीचा सण साजरा करण्याच्या प्रथा प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत. हा सण साजरा करण्यामागची आख्यायिका आणि मान्यता देखील वेगवेगळ्या आहेत. काही मान्यतांनुसार गौरीला श्री गणेशाची बहीण मानले जाते, तर प्रचलित दंतकथांनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि ती श्री गणेशाची माता आहे. काही लोक या सणाला महालक्ष्मी पूजादेखील म्हणतात आणि या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना करतात.

ज्येष्ठा गौरी आवाहन कथा

‘श्रीमहालक्ष्मी’ आणि त्यांची बहीण ‘श्रीअलक्ष्मी’चा जन्म झाला. श्रीमहालक्ष्मी म्हणजे (येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी) आणि श्रीअलक्ष्मी (म्हणजे येणारे धन जे खर्च होते त्या खर्चाला श्रीअलक्ष्मी) असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ हीदेखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यक अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्रीविष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीनं सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला.

हेदेखील वाचा- अक्रोड खाण्याचे तोटे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या आक्रोड कोणी खाऊ नये

एक आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. एके दिवशी भाद्रपद महिन्यामध्ये घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजवू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन!

हेदेखील वाचा- सफरचंद कापल्याबरोबर खराब होते का? या गोष्टींचा वापर करुन बघा

मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील! बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर काही मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधान केले. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले.

बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अंग ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल आणि तो उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.

म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरासुद्धा धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणांने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचत्या कशा करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग! गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही.

ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. जेष्ठागौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्ष सुख मिळेल. सतत, संपत्ती मिळेल.

Web Title: Ganesh chaturthi know the story of jyeshtha gauri avahana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पारंपरिक चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली थंडगार आंबटगोड सोलकढी आता घरीच बनवा, नोट करून घ्या रेसिपी

पारंपरिक चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली थंडगार आंबटगोड सोलकढी आता घरीच बनवा, नोट करून घ्या रेसिपी

Feb 26, 2026 | 10:20 AM
9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral

Feb 26, 2026 | 10:18 AM
Guruwar Vrat: 16 गुरुवारचे व्रत कोणी करावे? जाणून घ्या पूजा पद्धत आणि नियम

Guruwar Vrat: 16 गुरुवारचे व्रत कोणी करावे? जाणून घ्या पूजा पद्धत आणि नियम

Feb 26, 2026 | 10:00 AM
IND vs ZIM : झिम्बाब्वे सामन्यापूर्वी अभिषेक आणि अक्षर यांनी चेन्नईतील मारुंडीश्वर मंदिरात घेतला भोले बाबांचे आशीर्वाद

IND vs ZIM : झिम्बाब्वे सामन्यापूर्वी अभिषेक आणि अक्षर यांनी चेन्नईतील मारुंडीश्वर मंदिरात घेतला भोले बाबांचे आशीर्वाद

Feb 26, 2026 | 09:57 AM
PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा जगात डंका! इस्रायल अन् पॅलेस्टाईनकडून मिळाला सर्वोच्च बहुमान

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा जगात डंका! इस्रायल अन् पॅलेस्टाईनकडून मिळाला सर्वोच्च बहुमान

Feb 26, 2026 | 09:49 AM
PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र

PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र

Feb 26, 2026 | 09:48 AM
तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर हेअर डाय लावण्याऐवजी सुकलेल्या आवळ्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील काळेभोर

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर हेअर डाय लावण्याऐवजी सुकलेल्या आवळ्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील काळेभोर

Feb 26, 2026 | 09:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.