Navratri Horoscope: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Navratri Horoscope: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पंडितांच्या मते, यावेळी देवीचे आगमन हत्तीवर होत आहे. ज्यावेळेस देवी हत्तीवरुन येते तेव्हा शुभ मानले जाते. त्यामुळे शेती चांगली होते, सुख-शांती राहते. पण खरी खास गोष्ट आहे ती ग्रहांची चाल.
या नवरात्रीत एकाच वेळी तीन मोठे शुभ योग जुळून येत आहेत. जे जवळपास 100 वर्षांनंतर घडत आहे. सूर्य आणि बुध एकत्र आल्याने बुधादित्य योग बनतोय, चंद्र आणि गुरू एकत्र आल्याने गजकेसरी योग आणि बुध-शुक्र एकत्र आल्याने लक्ष्मीनारायण राजयोग बनतो. या तीन योगामुळे काही राशींचे भाग्य अचानक चमकणार आहे.
मेष वाल्यांसाठी ही नवरात्र बंपर असणार आहे. नोकरीत असाल तर बढतीचे चान्सेस आहेत. नवीन नोकरीची ऑफर पण येऊ शकते. खूप दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीचे फळ आता मिळेल.
धंदा करणाऱ्यांना पण मोठा फायदा होईल. एखादी मोठी ऑर्डर मिळेल. कुठे पैसे अडकले असतील तर ते या काळात परत येतील. कर्ज, उधारी कमी होईल. पैशाची चिंता मिटेल.
कर्क राशीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. कामावर तुम्हाला नवीन मोठी जबाबदारी दिली जाईल. यामुळे तुमचे पद वाढेल.घराण्याच्या प्रॉपर्टीतून लाभ होईल. जमीन, घर यासंबंधीचे वाद मिटतील. ऑफिसमध्ये लोक तुमचा मान ठेवतील. घरात पण सगळे आनंदात राहतील. एखादी गोड बातमी घरात येईल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर बदलण्यासाठी बेस्ट आहे. नोकरी सोडून नवीन काही सुरू करायचे असेल तर वेळ चांगली आहे. व्यवसायात असाल तर मान-प्रतिष्ठा वाढेल.तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. जे विद्यार्थी आहेत, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, त्यांना पण यश मिळेल. एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात मन लागेल.
Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा
तूळ राशीच्या लोकांना या नवरात्रीत पैशाचा खूप फायदा होणार आहे. नोकरीत पगार वाढ किंवा प्रमोशन मिळेल. व्यवसायात नफा वाढेल.आर्थिक परिस्थिती जी आधी टाईट होती ती आता सुधारेल. कुटुंबात पण शांतता राहील. सगळ्यांशी संबंध चांगले होतील. काम आणि घर दोन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकाल.तर या चार राशींनी या नऊ दिवसात देवीची सेवा मनापासून करावी. या दुर्मिळ योगाचा नक्की फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






