Sankashti Chaturthi: कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

Sankashti Chaturthi: कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी आहे. संकष्टी चतुर्थीचा दिवस गणेशाला समर्पित आहे. या दिवशी दिवसभर भक्त उपवास करणार आहे. या दिवशी विधीपूर्वक उपवास केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, असे म्हणतात.
कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे
कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे
Published on: 
Updated on: 
  • शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे

  • नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणतात

  • संकष्टी चतुर्थीला चंद्रोद्याची वेळ

सनातन धर्मामध्ये गणेशाला विघ्नहर्ता आणि पूजनीय देव मानले जाते. त्यांच्या पूजेसाठी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला 'गणाधिप संकष्टी चतुर्थी' म्हटले जाते. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान गणेशाची पूजा करतात आणि चंद्राला प्रार्थना करून उपवास सोडतात. कार्तिक महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे, पूजा पद्धत, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ जाणून घ्या

संकष्टी चतुर्थी कधी आहे

पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:४८ वाजता होणार आहे आणि २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३९ वाजता ही तिथी संपणार आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचा उपवास शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी पाळला जाणार आहे.

संकष्टी चतुर्थीला पूजा कशी करावी

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. त्यानंतर गणपतीचे ध्यान करून व्रताचा संकल्प करावा.

त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी आणि त्याला दुर्वा, फुले, रोली, अक्षत आणि फळे अर्पण करा.

यानंतर मोदक किंवा इतर आवडते पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.

गणेश मंत्राचा जप करा आणि गणेश चालिसाचे पठण करा.

संध्याकाळच्या पूजेनंतर चंद्रदर्शन घ्या आणि अर्घ्य अर्पण करून उपवास सोडा.

संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व

गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की गणाधिप संकष्टी चतुर्थीला भक्तिभावाने उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यास मदत होते. या दिवशी सुख, शांती आणि सुदैवाच्या इच्छेने गणपतीची पूजा केली जाते.

चंद्राला पाणी का अर्पण करतात

संकष्टी चतुर्थीच्या उपवासादरम्यान चंद्रदर्शन आणि पाणी अर्पण करण्याची एक विशेष परंपरा आहे. भक्त दिवसभर उपवास करतात आणि मग संध्याकाळी गणपतीची पूजा केल्यानंतर ते चंद्रदर्शन घेतात. त्यानंतर पाणी अर्पण करून ते आपला उपवास सोडतात.

चंद्रोद्याची वेळ

द्रिक पंचांगानुसार, गणधिप संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री ८:१८ असेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)