फोटो सौजन्य- istock
स्वयंपाकघरातील बदल हा फक्त सुविधेचा नाही तर वेळेची देखील गरज आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इंधनाविषयीच्या समस्येमुळे लोक स्वयंपाकघरात बदल करताना दिसून येत आहे. एलपीजी सिलिंडरबाबतच्या अनिश्चिततेमुळे अनेक घरांनी इंडक्शनचा वापर सुरू केला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की फक्त इंडक्शन विकत घेणे पुरेसे नाही ? वास्तुशास्त्रानुसार इंडक्शनची योग्य दिशा आणि वापर याचा आपल्या घरातील उर्जेवर परिणाम करतो. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. नंतर छोट्या छोट्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा वेळी वास्तूच्या नियमांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. इंडक्शन ठेवण्याची योग्य दिशा कोणती जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात अग्नीला विशेष महत्त्व आहे. यामुळे इंडक्शनला गॅससारखे पहिले जाते. दक्षिण पूर्व दिशेला अग्नी तत्वाचे स्थान मानले गेले आहे. जर इंडक्शन या दिशेला ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. काही कारणाने हे शक्य नसल्यास उत्तर पश्चिम दिशेला ठेवावे.
काही लोक घाईमध्ये कुठेही उभे राहून जेवण बनवतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार हेदेखील महत्त्वाचे आहे की तुम्ही कोणत्या दिशेला उभे राहून जेवण बनवता. पूर्व दिशेला उभे राहून जेवण बनवणे सर्वांत चांगले मानले जाते. यामुळे फक्त मानसिक शांती मिळत नाही तर कुटुंबातील आरोग्यावर परिणाम होतो.
स्वयंपाकघरात सर्वांत मोठी चूक म्हणजे इंडक्शन सिंक जवळ ठेवणे. जागेच्या कमतरतेमुळे लोक असे करतात. मात्र वास्तूंमध्ये हे योग्य मानले जात नाही. पाणी आणि आगीमुळे घरामध्ये तणाव आणू शकते. यामुळे पाणी आणि इंडक्शनच्या मध्ये अंतर असणे गरजेचे आहे.
केवळ दिशाच नव्हे, तर स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. अनेकदा असे दिसून येते की, इंडक्शन कुकरच्या आजूबाजूला घाणेरडी भांडी किंवा धूळ साचते. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. एक स्वच्छ आणि व्यवस्थित स्वयंपाकघर केवळ दिसायलाच चांगले नसते, तर घरात एक प्रसन्न आणि सकारात्मक वातावरणही निर्माण करते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: वास्तुशास्त्रानुसार इंडक्शन किंवा गॅस शेगडी आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा अग्नी तत्वाशी संबंधित असल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
Ans: यंपाक करताना पूर्व दिशेला तोंड असणे उत्तम मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहते.
Ans: हो, लाल, केशरी किंवा हलका पिवळा रंग अग्नी तत्व वाढवतात, त्यामुळे हे रंग किचनमध्ये वापरणे शुभ मानले जाते.






