सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ जाणार? (फोटो- ians)
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅरॉन फिंचने वर्ल्डकप 2027 मध्ये कोणते चार संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात याबाबत भाष्य केला आहे. अॅरॉन फिंचने भारत, ऑस्ट्रेलिया. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे चार संघ वर्ल्डकप 2027 च्या फायनलमध्ये जाऊ शकतील असे भाष्य केले आहे. 2027 मध्ये आयसीसी पुरुष वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. वर्ल्डकप सुरू होण्यासाठी एक वर्ष बाकी असताना आयसीसीने हे शेड्यूल जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये असणार आहेत.
ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर
कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघ अत्यंत चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्यासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघ वर्ल्डकप 2027 च्या सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात असे भाष्य केले आहे.
अॅरॉन फिंचने यामध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन संघांना स्थान दिलेले नाही. न्यूझीलंड संघाने मागील अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये अंतिम किंवा उपांत्य फेरीपर्यंत दमदार मजल मारली आहे, तर पाकिस्तानचा संघही पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून पाहिला जातो. मात्र, आफ्रिकेच्या खेळपट्टी पाहता फिंचने त्या दोन संघांना स्थान दिलेले नाही.
चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या महामुकाबल्यात भारताची गाठ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी पडली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीचे प्रदर्शन करत भारताचा ६ गडी राखून पराभव केला.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या महामुकाबल्यात भारताची गाठ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी पडली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीचे प्रदर्शन करत भारताचा ६ विकेट्स राखून पराभव केला.






