ईशान किशनची तडाखे खेळी (फोटो- ians)
ईस्ट झोनकडून सामन्याच्या सुरुवातीला ओपनर्सनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी साऊथ झोनच्या गोलंदाजांना त्रास दिला. ओपनर्सनी रचलेल्या या पायावर नंतरच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर शिखर मोहनने अत्यंत संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला अडीचशेच्या पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
शिखर मोहन बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार ईशान किशनने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. ईशानने दक्षिण विभागाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत शानदार शतक ठोकले. त्याला दुसऱ्या टोकाकडून कुमार कुशाग्रने उत्तम साथ दिली. कुमार कुशाग्रनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान ईस्ट झोन कडून कर्णधार ईशान किशनने 250 धावांची वैयक्तिक खेळी केली आहे.
Duleep Trophy 2026: नुसते वादळ अन् प्रतिस्पर्धी चक्काचूर! Ishan Kishan ची डबल सेंचुरी अन्…
फायनलचा पहिलाच दिवस कर्णधार ईशान किशनने गाजवला. त्याने तडाखेबंद खेळी केली. ईशान किशनने 250 रन्स केल्या होत्या. दरम्यान 250 रन्स करून रिटायर हर्ट झाला होता. मात्र तो पुन्हा एकदा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दुसऱ्या दिवशी, किशन आणि कुशाग्र यांनी आपला डाव पुढे चालू ठेवला. साऊथ झोनच्या गोलंदाजांना त्यांनी चागंलेच धुतले. कुशाग्रने १३२ चेंडूंमध्ये १०१ धावा करून शानदार शतक ठोकले, त्यानंतर ईशान किशनने मागे वळून पाहिले नाही. तो सध्या 269 वर नॉट आउट खेळत आहे.
ईस्ट झोन: अभिमन्यू इसवरन, वैभव सूर्यवंशी, कुमार कुशाग्रा, सुदीप कुमार घरामी, ईशान किशन (विकेटकीपर/कर्णधार), शिखर मोहन, अनुकुल रॉय, मोहम्मद कौनैन कुरेशी, मोहम्मद शामी, अभिजित के सरकार, मुकेश कुमार
साऊथ झोन: रिकी भुई, नारायण जगदीसन (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शेख रशीद, तिलक वर्मा (कर्णधार), स्मरण रविचंद्रन, श्रेयस गोपाल, त्रिपुराना विजय, मोहम्मद सिराज, चामा व्ही मिलिंद, एमडी निधिश






