अभिषेक शर्मा (फोटो- ians)
भारतीय संघाचा युवा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या आपल्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक रन्स करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. आज भारतीय संघ हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्माकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?
भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मासाठी हे वर्ष चांगले गेले असल्याचे दिसून येत आहे. . वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी चौथ्या टी-२० सामन्यात जर अभिषेकने 79 रन्स केल्या तर तो एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे. या खेळीसह तो वर्ष २०२६ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० रन्सचा टप्पा पूर्ण करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरेल. यापूर्वी ईशान किशनने या वर्षात हा पराक्रम केला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी२० आंतरराष्ट्रीय सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर थेट पाहता येईल. कॉमेंट्री इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये उपलब्ध असेल. फॅन्स हा सामना जिओहॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकतात.
भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स डी यादव, मयंक यादव, नमन धीर.
वेस्ट इंडिज: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, अमीर जांगू, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोवमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.






