
मुंबई: आजपासून आयपीएल-२०२२ च्या सीझनची सुरुवात होणार असून, यात फोर, सिक्स यांचा पाऊस प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मात्र त्याचबरोबरच आयपीएलचे क्रिकेटर्स, टीमचे मालक आणि खुद्द बीसीसीआय यांच्यावर या सीझनमधून पैशांचा पाऊस पडणार आहे. २००८ मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सीझनपासून सातत्याने आयपीएलची लोकप्रियता आणि कमाई सातत्याने वाढतच चालली आहे. २००८ सली ८ टीममधून सुरु झालेल्या या मॅचेस आता १० टीम्सपर्यंत पोहचल्या आहेत.
आयपीएल एक धंदा
आयपीएल हा पूर्ण व्यवसाय आहे. यात प्रत्येक भागात बीसीसीआय आणि टीम मालकांना प्रचंड कमाई होते. आयपीलच्या कमाईवर नजर टाकूयात.
ही कमी तीन टप्प्यात विभागता येऊ शकेल.
टायटल स्पॉन्सरशीपमधअये टीमला कमाईची संधी आहे. आयपीएलच्या आधी ज्या कंपनीचे नाव लागते, त्याला टायटल स्पॉन्सरशीप म्हणतात. कंपन्यांना याचा प्रचारासाठी खूप फायदा होत सल्याने यावरही मोठी बोली लावण्यात येते. वीवोने २०१८ ते २०२२ या काळासाठी हे राईट्स २१९९ कोटींना विकत घेतले होते, मात्र भारत-चीन वादात २०२० मध्ये ड्रीम ११ हा टायटल स्पॉन्सर झाला, त्यासाठी त्याने २२२ कोटी दिले. यंदाच्या टाटा आय़पीएलसाठी ६०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.