Kabaddi Tournament : रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची विजयी आगेकूच; माटुंगा वर्कशॉपला चारली धूळ
अजिंक्य कापरेच्या पल्लेदार चढाया आणि साई केरूडच्या पोलादी पकडीच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने माटुंगा वर्कशॉपवर ३२ गुणांनी दणदणीत विजय मिळवला.
दुसऱ्या फेरीतील अन्य लढतीत बीपीटीने मुंबई पोलिसांचा 45-20 असा 25 गुणांनी पराभव केला. बीपीटीकडून अनुराग सिंगने चढाईत, तर रूपेश साळुंखेने पकडीत प्रभावी कामगिरी केली. मुंबई पोलिसांकडून विजय घाडगेने चढाईत झुंज दिली.
पश्चिम रेल्वेने नेस्टजेन ॲकॅडमीचा 53-33 असा 20 गुणांनी पराभव केला. पश्चिम रेल्वेकडून प्रणय राणेने चढाईत, तर आकाश शर्माने पकडीत चमक दाखवली. नेस्टजेन ॲकॅडमीकडून निखिल पुजारीने चढाईत आणि सुशांत वाघमोरेने पकडीत योगदान दिले.
सेंट्रल रेल्वेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर 34-20 असा 14 गुणांनी विजय मिळवला. सेंट्रल रेल्वेकडून समीर भोगलेने चढाईत, तर राहुल परबने पकडीत प्रभावी कामगिरी केली. रिझर्व्ह बँकेकडून सुमित मिसाळ आणि शंकर साळुंखे यांनी अनुक्रमे चढाई आणि पकडीत प्रयत्न केले.
कुमार गटात अमर क्रीडा मंडळाने श्रीराम क्रीडा मंडळाचा 53-33 असा 20 गुणांनी पराभव केला. अमर क्रीडा मंडळाकडून साहिल बंगरने चढाईत, तर सागर राजपूतने पकडीत चांगली कामगिरी केली. श्रीरामकडून अमित सिंगने चढाईत आणि हर्ष काळेने पकडीत प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
अन्य सामन्यात विजय क्लबने नवोदित क्रीडा मंडळावर 37-28 असा नऊ गुणांनी विजय मिळवला. विजय क्लबकडून श्रेयान पुजारी आणि विजेंद्र यादव यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत योगदान दिले. नवोदित क्रीडा मंडळाकडून तनीक्ष चव्हाणने चढाईत, तर विघ्नेश गुरवने पकडीत कामगिरी केली.
भारतीय महिला क्रिकेटला मोठा धक्का! स्टार सलामीवीर Poonam Raut ची निवृत्ती
महिला गटात विवेक महिला संघाने जिजामाता महिला संघाचा 42-7 असा 35 गुणांनी धुव्वा उडवला. विवेककडून हरजीत संधूने चढाईत, तर स्विटीने पकडीत प्रभावी कामगिरी केली. जिजामाता संघाकडून वेदिका सावंतने चढाईत आणि कृतिका चव्हाणने पकडीत प्रयत्न केले.
दुसऱ्या सामन्यात डॉ. शिरोडकर संघाने स्वामी समर्थ महिला संघावर 45-25 असा 20 गुणांनी विजय मिळवला. डॉ. शिरोडकर संघाकडून साक्षी सावंतने चढाईत, तर श्रावणी घाडीगावकरने पकडीत चमक दाखवली. स्वामी समर्थ संघाकडून साक्षी जंगमने चढाईत आणि सई शिंदेने पकडीत योगदान दिले.
शिवनेरी कबड्डी महोत्सवातील या सामन्यांमध्ये खेळाडूंच्या चपळ चढाया, अचूक पकडी आणि सांघिक कामगिरीमुळे कबड्डीप्रेमींना रंगतदार सामने पाहायला मिळाले.
Ans: रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने माटुंगा वर्कशॉपचा ४२-१० असा पराभव केला.
Ans: तिसऱ्या फेरीत रिजनल स्पोर्ट्स बोर्डाचा सामना बीपीटी संघाशी होणार आहे.
Ans: पश्चिम रेल्वेने नेस्टजेन ॲकॅडमीचा ५३-३३ असा पराभव केला.






