मोठी बातमी! 'हा' सर्वोत्तम क्रिकेटपटू लवकरच घेणार निवृत्ती? समोर आली तारीख

Mushfiqur Rahim: फेब्रुवारी २०२७ मध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या घरच्या टेस्ट सिरीजमचा पहिला सामना खेळून झाल्यावर तो आपला निवृत्तीचा जाहीर करण्याची शक्यता आहे.
इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटचा घेणार निरोप
मुशफिकुर रहीम निवृत्ती घेणार(फोटो- istockphoto)
Published on: 
Updated on: 
  • मुशफिकुरने जाहीर केली निवृत्तीची तारीख

  • इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटचा घेणार निरोप

  • मीरपुरमध्ये शेवटचा सामना खेळण्याची शक्यता

Mushfiqur Rahim: क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांग्लादेश क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडू मुशफिकुर रहीमबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मीरपुरमध्ये तो आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो क्रिकेटच्या सर्व फॉर्मटमधून निवृत्त झालेला असणार आहे.

फेब्रुवारी २०२७ मध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या घरच्या टेस्ट सिरीजमचा पहिला सामना खेळून झाल्यावर तो आपला निवृत्तीचा जाहीर करण्याची शक्यता आहे. मीरपूर येथे खेळला जाणारा हा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरेल असे म्हटले जात आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी या निर्णयाला अधिकृत दुजोरा दिल्याचे समजते आहे.

SA vs BAN: बांग्लादेशला दणक्यावर दणका! पहिला सामना गमावला अन् आता 'हा' खेळाडू बाहेर, अवस्था झाली वाईट

काही दिवसांपूर्वी मुशफिकुर रहीमने आपल्या निवृत्तीची इच्छा बोलून दाखवल्याचे तमीम इकबाल यांनी सांगितले. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी ही बातमी द्यावी अशी मुशफिकुरची इच्छा असल्याचे समजते आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये इंग्लंडविरुद्ध बांग्लादेशचा संघ टेस्ट सिरीज खेळणार आहे.

बांगलादेशच्या कसोटी फलंदाजीच्या मिडल ऑर्डरमधील एक प्रमुख फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीरपूरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळून झाल्यावर कसोटी प्रवासाला पूर्णविराम देण्याचा निर्णय मुशफिकुर रहीमचा झाल्याचे समोर आले आहे.

बांग्लादेशी खेळाडूने 100 व्या कसोटी सामन्यात रचला इतिहास! सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीला हे जमले नाही

अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम याच्या निवृत्तीबाबत माहिती समोर आली आहे. एखाद्या दिग्गज खेळाडूचा निरोप किंवा संन्यास जाहीर करताना स्वतः खेळाडू समोर येणे अधिक योग्य मानले जाते. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने देखील तसा विचार मांडला होता. मुशफिकुर सध्या फॉर्मसाठी मे महिन्यात पाकिस्तानविरुद्ध शानदार शतकी खेळी केली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टनंतर रहीमच्या बॅटमधून रन्स येणे कठीण झाले होते. त्यानंतर त्याला केवळ 11 इनिंगमध्ये 50 रन्सचा टप्पा एकदाच ओलंडता आलेला आहे. त्यामुळे खराब फॉर्म पाहता आणि वाढत असलेला दबाव यामुळे रहीमने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

मुशफिकुर रहीमने बांगलादेश क्रिकेटच्या कसोटी इतिहासात एक नवा विक्रम रचला आहे. १०० कसोटी सामने खेळणारा तो बांग्लादेशचा एकमेव खेळाडू ठरला आहे. मुशफिकुरने मे २००५ मध्ये इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आपला पहिला कसोटी सामना खेळला. जवळपास दोन दशकांच्या प्रदीर्घ कसोटी प्रवासात त्याने बांगलादेश संघासाठी अनेक संस्मरणीय इनिंग खेळल्या आहेत.

Q

मुशफिकुर रहीमने कोणत्या क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे?

A

बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Q

मुशफिकुर रहीम आपला शेवटचा कसोटी सामना कुठे खेळण्याची शक्यता आहे?

A

मुशफिकुर रहीम मीरपूर येथे आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होणार असल्याचे वृत्त आहे.

इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटचा घेणार निरोप
बांग्लादेशी खेळाडूने 100 व्या कसोटी सामन्यात रचला इतिहास! सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीला हे जमले नाही