pakistan vs england test cricket (फोटो- ट्विटर)
पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून केवळ एका खेळाडूने अर्धशतकी खेळी केली आहे. बाबर आझम दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी सलमान अली आगा पाकिस्तानचे नेतृत्व करत आहे. पाकिस्तानचे सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. पाकिस्तानने आपली पहिली विकेट पहिल्याच बॉलवर गमावली होती.
पाकिस्तानचा डाव त्यानंतर गडगडला. त्यांना धावसंख्या उभरताच आली नाही. २०० रन्सच्या आत पाकिस्तानचा संघ ऑल आउट झाला. अब्दूला शफिकने ६१ रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र तो आउट झाल्यावर पूर्ण संघ पटापट आउट झाला. पाकिस्तानच्या संघाने पुन्हा एकदा निराशा केली. ५० ओव्हर्सपेक्षा कमी ओव्हर्स खेळलेल्या पाकिस्तानने १७१ रन्सपेक्षा कमी रन्स केल्या.
खळबळ उडाली! Babar Azam च्या हाताला दुखापत; England विरुद्ध खेळणार की नाही?
इंग्लंडकडून दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ५-५ विकेट्स घेतल्या. याआधी पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट सिरिज खेळून आला आहे. त्यातील पहिला सामना पाकिस्तान पराभूत झाला तर दुसरा सामना जिंकला. मात्र आता इंग्लंडविरुद्ध पहिला सामना गमावण्याचे संकट पाकिस्तानच्या संघावर ओढवल्याचे दिसून येत आहे.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम खेळत नाहीये. त्याच्या हाताला दुखापत झाली असल्याने त्याला या सांनीयतून विश्रांती देण्यात आली आहे. या सांनीयचे अद्याप चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे गोलंदाज काही कमाल करून हा सामना आपल्या बाजूने फिरवणार का येत्या चार दिवसांसमध्ये पाहायला मिळणार आहे.
ENG Vs PAK: पाकिस्तानला दुहेरी धक्का! Babar Azam सामन्याबाहेर; तर पहिल्याच बॉलवर…
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानचा फलंदाज पहिल्याच बॉलवर आउट होण्याची दुसरी वेळ आहे. तर पहिल्याच बॉलवर कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याची इंग्लंडच्या गोलंदाजांची ही चौथी वेळ आहे. ओली रॉबिन्सनने मालिकेची सुरुवात अत्यंत भेदक केली. पहिल्याच चेंडूवर अझान ओवैसला बाद केल्यानंतर त्याने आपल्या तिसऱ्याच षटकात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदलाही बाद करून पाकिस्तानची अवस्था बिकट केली.






