Paras Mhambrey: IPL 2027 आधी पंजाब किंग्सचा मोठा डाव! हार्दिकनंतर मुंबई इंडियन्सचा आणखी एक PBKS च्या ताफ्यात

Paras Mhambrey Joined PBKS for IPL 2027: आयपीएल २०२७ च्या आधी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या एका ट्रेडद्वारे पंजाब किंग्समध्ये सामील झाला होता. आता, एमआयचा आणखी एक माजी सदस्य पीबीकेएसमध्ये सामील झाला आहे.
Paras Mhambrey Joined PBKS
Paras Mhambrey Joined PBKSParas Mhambrey Joined PBKS
Published on: 
Updated on: 
  • IPL 2027 आधी मोठी घोषणा

  • पंजाब किंग्सने टाकला मोठा डाव

  • हार्दिकनंतर आता पारस म्हाम्ब्रेही पंजाबच्या गोटात

Paras Mhambrey: आयपीएल २०२७ च्या आधी पंजाब किंग्सच्या ताफ्यातून एक मोठी बातमी येत आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या नुकताच एका ट्रेडद्वारे पंजाब किंग्समध्ये सामील झाला होता.

आता, एमआयचा आणखी एक माजी सदस्य पीबीकेएस संघात सामील झाला आहे. पारस म्हंब्रेचा मुंबई इंडियन्ससोबतचा कार्यकाळ नुकताच संपला असून, तो आता पंजाब किंग्समध्ये सामील झाला आहे. त्याच्या पीबीकेएसमध्ये सामील होण्याच्या अफवा काही काळापासून पसरत होत्या, पण आता ही घोषणा अधिकृत करण्यात आली आहे.

पारस म्हाम्ब्रे पंजाब किंग्समध्ये सामील

भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांचा नुकताच मुंबई इंडियन्ससोबतचा कार्यकाळ संपला. यानंतर, ते पंजाब किंग्समध्ये सामील होणार असल्याची बातमी समोर आली. आता, पारस म्हाम्ब्रे अधिकृतपणे पंजाब किंग्समध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाले आहेत. ते अनेक वर्षांपासून प्रशिक्षण क्षेत्रात काम करत असून आता ते पंजाबसोबत एक नवीन प्रवास सुरू करणार आहेत.

Paras Mhambrey Joined PBKS
IND vs NZ: दुसऱ्या कसोटीत कर्णधार गिलचा मोठा गेमप्लॅन! सिराजचं कमबॅक, प्रसिद्ध कृष्णाचा पत्ता कट? कशी असेल भारताची संभाव्य Playing 11

पारस म्हाम्ब्रे यांची प्रशिक्षण कारकीर्द

पारस म्हाम्ब्रे यांनी २००३ मध्ये आपल्या प्रशिक्षण कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी सर्वप्रथम बंगाल संघासोबत काम केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र, बडोदा आणि विदर्भ संघांचे मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहिले. पारस यांनी २०१५ ते २०२१ या काळात भारतीय १९ वर्षांखालील संघ आणि भारत 'अ' संघासोबत काम केले.

पारस म्हाम्ब्रे यांची २०२१ मध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत काम केले. त्यांच्या कार्यकाळात भारताचा वेगवान गोलंदाजीचा मारा अधिक मजबूत झाला आणि टीम इंडियाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना गाठला. २०२४ मध्ये भारताच्या टी-२० विश्वचषक विजयासह पारस यांचा कार्यकाळ संपला.

पारस म्हाम्ब्रे ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाले. त्यांनी दोन वर्षे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. आयपीएल २०२६ मधील मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीनंतर, त्यांनी संपूर्ण कोचिंग स्टाफ बदलण्याचा निर्णय घेतला. पारस म्हाम्ब्रे आणि लसिथ मलिंगा या दोघांचाही गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला. हार्दिक पांड्या अलीकडेच एका ट्रेडद्वारे पीबीकेएसमध्ये सामील झाला आहे. आता पारस यांनीही एमआय (MI) सोडून पीबीकेएसमध्ये प्रवेश केला आहे.

Paras Mhambrey Joined PBKS
IND A vs SL A: फायनलसाठी आरपारची लढाई! श्रीलंकेचा विजयरथ रोखण्यासाठी भारत सज्ज; सेमीफायनलचा थरार कधी अन् कुठे?