IND A vs SL A: फायनलसाठी आरपारची लढाई! श्रीलंकेचा विजयरथ रोखण्यासाठी भारत सज्ज; सेमीफायनलचा थरार कधी अन् कुठे?

IND A vs SL Asia Cup rising stars Semifinal: रायझिंग स्टार्स आशिया कपच्या सेमिफायनलमध्ये भारत आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहेत. हा सामना कधी आणि केव्हा खेळला जाईल, जाणून घ्या.
IND A vs SL Asia Cup rising stars Semifinal
IND A vs SL Asia CupIND A vs SL Asia Cup rising stars Semifinal
Published on: 
Updated on: 
  • भारत विरुद्ध श्रीलंका हायव्होल्टेज सामना

  • टीम इंडिया फायनलपासून एक पाऊल दूर

  • कधी रंगणार महामुकाबला?

IND A vs SL A: रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत 'अ' ने यूएईवर दणदणीत विजय मिळवून, उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. पहिला उपांत्य सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल. हे दोन्ही संघ फायनलमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी भिडतील. 'ब' गटात पाकिस्तानने अव्वल स्थान पटकावले तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच, अ' गटातून श्रीलंकाने तीनपैकी तीन सामने जिंकून सहा गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सेमिफायनलचा सामन्याचा थरार कधी आणि केव्हा रंगणार, जाणून घ्या.

भारत 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ' उपांत्य फेरीचा सामना कधी ?

रायझिंग एशिया कप २०२६ चा पहिला उपांत्य सामना २६ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. हे दोन्ही संघ दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील.

या मैदानावर भारतीय संघाने आधीच दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्याचा निकाल वेगवेगळा लागल्यामुळे या सामन्यात खेळपट्टीचा अंदाज कसा असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. तुम्ही रायझिंग स्टार आशिया कप २०२६ चा उपांत्य सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क्स आणि सोनी लिव्ह ॲपवर थेट पाहू शकता.

IND A vs SL Asia Cup rising stars Semifinal
IPL 2027 Auction: 66 जागा अन् 1220 दावेदार! IPL 2027 ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पडणार; कोणत्या खेळाडूंचं नशीब चमकणार?

श्रीलंकेचा संघ आतापर्यंत अपराजित

श्रीलंकेने आपल्या गटातील तिन्ही सामने जिंकून प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि उपांत्य फेरीत धमाकेदार प्रवेश केला आहे. दुसरीकडे, भारतानेही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध ३१४ धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले असले तरी, नेपाळ आणि युएईविरुद्ध मोठे विजय मिळवून त्यांनी उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. श्रीलंकेच्या संघाने अद्याप एकही सामना गमावलेला नसल्यामुळे उपांत्य फेरीत भारताला श्रीलंकेविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

उपांत्य फेरीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग ११

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, हर्ष दुबे, हर्षित राणा आणि अरशद खान.

IND A vs SL Asia Cup rising stars Semifinal
Vaibhav Sooryanvanshi: ६ संघाच्या एकत्रित सिक्स वैभवच्या नावे, पाकिस्तानची तंतरली; वैभव सूर्यवंशीची दहशत