CSK Vs SRH Toss Live Streaming (फोटो- सोशल मिडिया)
चेन्नई सुपर किंग्ज अन् एसआरएच येणार आमनेसामने
संजू सॅमसनच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष
हेड अन् अभिषेक शर्मा आक्रमक खेळींच्या तयारीत
Tata IPL 2026 CSK Vs SRH Toss Live Updates: थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू होणार आहे. आजचा सामना हा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. दरम्यान (IPL 2026) आजच्या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि एसआरएचचे संघ यंदाच्या हंगामात बरोबरीच्या ठिकाणी आहेत. पाच पैकी प्रत्येक संघाने प्रत्येकी दोन-दोन सामने जिंकले आहेत. चेन्नईचा सलामीवीर संजू सॅमसनला फॉर्म सापडला आहे. मागील दोन्ही सामन्यात त्याने चांगली खेळी केली. तर एसआरएच कडून ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरी क्लासेन फॉर्ममध्ये आहेत.
चेन्नईकडून गेल्या दोन्ही सामन्यात गोलंदाजी देखील प्रभावी झाली आहे. गुर्जनप्रीत सिंग, नूर अहमद, खलील अहमद आणि अन्य गोलंदाजांनी प्रभावी आणि भेदक गोलंदाजी केली आहे. एसआरएचला काही सामन्यांत प्रभावी गोलंदाजी करता न आल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र मागच्या सामन्यात प्रफुल हिंगेने पदर्पणातच जबरदस्त गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला आहे.
CSK Vs SRH Pitch Report: स्पिनर्सची जादू चालणार की फलंदाजांची…; कसे आहे आजचे पीच? वाचा सविस्तर…
एसआरएचने आतापर्यंत 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. एसआरएचचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहे. तर ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई सुपर किंग्जने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. चेन्नईचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 8 व्या स्थानावर आहे. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट कसा आहे त्याबाबत जाणून घेऊयात.
पिच रिपोर्ट
आजचा चेन्नई विरुद्ध एसआरएचचा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. एसआरएचने यंदाच्या हंगामात होम ग्राऊंडवर दोन्ही सामने जिंकले आहेत. मागील सामन्यात प्रफुल हिंगे आणि साकीब हुसेनने भेदक गोलंदाजी केली. हे स्टेडियम हाय स्कोअरिंग साठी ओळखले जाते. या स्टेडियम कोणताही संघ टॉस जिंकून चेज करण्यास प्राधान्य देताना पाहायला मिळते.
RCB Vs DC Live: दिल्लीच्या गोलंदाजांना ‘सॉल्ट’ झोंबला; कॅपिटल्सला विजयासाठी ‘इतक्या’ रन्सची गरज
सीएसकेची संभाव्य टीम: संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सरफराज खान, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, गुरजपनीत सिंग, मुकेश चौधरी, महेश तीक्षणा, मॅट हेन्री
एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन , हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, हर्ष दुबे, नीतिश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे , शिवंग कुमार,हर्षल पटेल, सलील अरोरा






