RCB vs LSG Live Updates (फोटो- ट्विटर)
आरसीबीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
निकोलस पूरनने कायम ठेवला खराब फॉर्म
ऋषभ पंत केवळ 1 रन करून आउट
Tata IPL 2026 LSG Vs RCB Live Updates: आयपीएलचा थरार सुरू होऊन काही दिवस झाले आहेत. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. सध्या बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (IPL2026) कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये येण्यासाठी एलएसजीसाठी आजचा सामना महत्वाचा समजला जात आहे. दरम्यान एलएसजीने आरसीबीला 147 रन्सचे टार्गेट दिले आहे.
एलएसजीची फलंदाजी
एलएसजीला आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. एलएसजीकडून एडन मारक्रम आणि मिशेल मार्श सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. 3 ओव्हर्समध्ये एलएसजीने चांगली सुरुवात केली. मात्र एडन मारक्रम केवळ 12 रन्स करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत खेळण्यासाठी आला. मात्र तो रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर निकोलस पूरन खेळण्यासाठी आला. मात्र त्याने निराशा केली. तो एकही रन न करता आउट झाला.
मिशेल मार्श 40 रन्स करून आउट झाला. त्यानंतर अब्दुल समद देखील एलएसजीसाठी चांगली खेळी करू शकला नाही. तो एकही रन न करता आउट झाला. आयुष बडोनीने 38 रन्सची शानदार खेळी केली. तर जॉर्ज लिंडेने केवळ 7 रन्सच केल्या. मोहम्मद शामी खाते देखील उघडू शकला नाही. मुकुल चौधरी 39 रन्सची खेळी केली.
Ayush Badoni and Mukul Choudhary fighting it out for @LucknowIPL #LSG 112/4 in 15 overs Predict their final score 👇 Updates ▶️ https://t.co/UztAZM9l0q#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvLSG pic.twitter.com/X34jXRB2yH — IndianPremierLeague (@IPL) April 15, 2026
आरसीबीची गोलंदाजी
एलएसजीने 3 ओव्हर्समध्ये चांगली सुरुवात केली. मात्र रसिख डारने 4 थ्या ओव्हरमध्ये एडन मारक्रमची विकेट घेतली. देवदत्त पाडीकलने मारक्रमची कॅच पकडली. जोश हेझलवूडने जबरदस्त गोलंदाजी करत निकोलस पूरनला शून्यावर आउट केले. कृणाल पंड्याने 40 रन्सवर असलेल्या मिशेल मार्शची विकेट घेतली. कृणाल पंड्याने अब्दुल समदची विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारने 3 विकेट पटकावल्या. रसिख डारने एलएसजीची दाणादाण उडवली. त्याने एकूण 4 विकेट्स घेतल्या.
आज काहीतरी नवीन घडणार! ‘या’ ठिकाणी रन्सचा पाऊस की…; पहा RCB Vs LSG चा Pitch Report
आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी / जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रासीख सलाम.
एलएसजीची संभाव्य टीम: एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत , आयुष बदोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे / एनरिक नॉर्खिया, मोहम्मद शमी, दिग्वेज सिंह राठी, प्रिन्स यादव / मयंक यादव.






