BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत
बीजीएमआयमध्ये व्हॉट्सअॅपद्वारे लॉगिन करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे आणि चॅट्स बेस्ड आहे. म्हणजेच आता गेममध्ये लॉगिन करताना तुम्हाला क्रेडेंशियल्सचा वापर करण्याची गरज नाही. याऐवजी आता ऑथेंटिकेशनसाठी गेमर्सना व्हॉट्सअॅप कन्वर्सेशनवर रिडायरेक्ट केले जाणार आहे. ज्या गेमर्सना मोबाईलद्वारे ऑथेंटिकेट करायचे आहे किंवा ज्यांना सोशल मीडिया लॉगिनला पर्याय हवा आहे, अशा प्लेअर्ससाठी हे फीचर सुरु करण्यात आले आहे. केवळ लॉगिनच नाही तर नव्या फीचरच्या मदतीने रिकवरी देखील अगदी सहज केली जाणार आहे. यासाठी यूजर्सचे व्हॉट्सअॅप अकाऊंट त्यांच्या मोबाईल नंबरसह लिंक असणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
बीजीएमआय व्हॉट्सअॅप लॉगिन फीचरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी बीजीएमआय ओपन करा. इथे तुम्हाला लॉगिन विथ व्हॉट्सअॅपचा पर्याय दिसणार आहे. या पर्यायावर टॅप केल्यानंतर व्हॉट्सअॅप चॅट विंडोजवर रिडायरेक्ट केले जाणार आहे. इथे तुम्हाला प्री-फील्ड मेसेज दिसेल. हा मेसेज सेंड करा. तुम्ही या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर लॉगिन प्रोसेस सुरु होणार आहे. यानंतर चॅटमध्ये तुम्हाला एक लॉगिन लिंक दिसेल. या लिंकवर टॅप केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये बीजीएमआय ओपन होईल आणि तुम्ही तुमचे अकाऊंट एक्सेस करू शकाल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच व्हॉट्सअॅपद्वारे ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करण्यासाठी पासवर्डची गरज भासत नाही.
गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल
बीजीएमआयमध्ये सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्सचा समावेश केला जात आहे. अलीकडेच कंपनीने 4.3 अपडेट देखील रिलीज केले होते. ज्यामध्ये थीम्ड मोड आणि मॅपमधील सुधारणांसारखे नवीन गेमप्ले एलिमेंट्स जोडण्यात आले होते. यानंतर आता कंपनी आणखी एक अपडेट घेऊन आली आहे. ज्यामध्ये प्लेअर्सना व्हॉट्सअॅपद्वारे लॉगिन करण्याची सुविधा मिळणार आहे.






