फोटो सौजन्य सोशल मिडिया
हा विस्तार अशा वेळी होत आहे जेव्हा कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठी गती मिळत आहे। आर्थिक वर्ष २०२६ मध्ये बोटच्या आंतरराष्ट्रीय महसुलात दुपटीहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. श्रीलंका आणि भूतानमधील प्रवेशामुळे दक्षिण-पूर्व आशिया आणि जीसीसी क्षेत्रातील बोटची वाढती आंतरराष्ट्रीय उपस्थिती अधिक मजबूत होईल. या दोन्ही देशांमधील तरुण ग्राहकवर्ग, डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि भारतीय ब्रँड्सबद्दल असलेले आकर्षण यामुळे बोटच्या तंत्रज्ञान उत्पादनांना मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
कंपनी टप्प्याटप्प्याने या बाजारपेठांमध्ये वैयक्तिक ऑडिओ उत्पादने, स्मार्टवॉच आणि चार्जिंग सोल्यूशन्स सादर करणार असून स्थानिक ग्राहकांची पसंती आणि मागणीनुसार आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यात येईल. या विस्ताराबाबत बोलताना बोटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव नैय्यर म्हणाले, “आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय विस्तार म्हणजे केवळ तीच उत्पादने अधिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून देणे नव्हे, तर प्रत्येक बाजारपेठ समजून घेऊन तेथील ग्राहकांच्या गरजांनुसार ब्रँडला प्रासंगिक बनवणे हे आहे.
आंतरराष्ट्रीय व्यवसायातील मजबूत वाढ या संधीबद्दलचा आमचा विश्वास अधिक दृढ करते. भारतात विकसित झालेल्या बोटला जागतिक ग्राहक जीवनशैली आणि तंत्रज्ञान ब्रँड बनवणे हे आमचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. उत्पादने, डिझाइन आणि नवकल्पना यांच्या बळावर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
CNAP Caller: फसवे कॉल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? 1 नोव्हेंबरपासून स्क्रीनवर दिसणार कॉलरचं नाव
बोटच्या या आंतरराष्ट्रीय विस्ताराला भारतातील इन-हाउस संशोधन आणि विकास केंद्र ‘बोट लॅब्स’ चे मोठे पाठबळ लाभत आहे. या सेंटरमध्ये १०० हून अधिक अभियंते कार्यरत असून ते नवनवीन उत्पादने विकसित करत आहेत. मुख्य ऑडिओ व्यवसायासोबतच आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा वेअरेबल्स व्यवसाय नफ्यात आला आहे, ज्यामुळे बोट आता एक व्यापक ग्राहक तंत्रज्ञान कंपनी म्हणून वेगाने पुढे येत आहेत.
येत्या काळात बोट विद्यमान आंतरराष्ट्रीय बाजारांमधील स्थान मजबूत करण्यासोबतच दक्षिण आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि जीसीसी क्षेत्रातील इतर उच्च क्षमतेच्या बाजारपेठांमध्ये विस्ताराच्या नव्या संधींचा विचार करत आहे.






