

HONOR Magic9 Pro Max स्मार्टफोन केवळ मलेशियातील बाजारात लाँच
स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत मलेशियामध्ये RM5,999 म्हणजेच सुमारे 1.35 लाख रुपये
फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो 1/1.28-इंच सेंसर आणि ओआयएस सपोर्टने सुसज्ज आहे
HONOR Smartphone Launched: टेक कंपनी Honor च्या मॅजिक सिरीजला 10 वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. याच निमित्ताने कंपनीने नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा हा नवीन स्मार्टफोन HONOR Magic9 Pro Max या नावाने लाँच केला आहे. सध्या कंपनीने हा स्मार्टफोन केवळ मलेशियातील बाजारात लाँच केला आहे. या डिव्हाईसच्या कॅमेरा सिस्टिमने सर्वांचे लक्ष वेधले आहे, ज्याला कॅमेरा मेकर ARRI च्या सहयोगाने तयार करण्यात आले आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, डिव्हाईसच्या 24GB रॅम ज्यामध्ये 12GB टर्बो रॅम आहे आणि 512GB स्टोरेज अशा व्हेरिअंटची किंमत मलेशियामध्ये RM5,999 म्हणजेच सुमारे 1.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन शॅडो ब्लॅक, ग्लेशियर सिल्व्हर आणि मॉस ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची प्री-बुकींग 24 नोव्हेंबरपासून 3 डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे. 4 डिसेंबर 2026 पासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य - Honor)
सिनेमॅटिक इमेजिंग सिस्टिम
हॉनर मॅजिक9 प्रो मॅक्स मध्ये ARRI च्या सहयोगाने तयार करण्यात आलेले सिनेमॅटिक इमेजिंग सिस्टिम पाहायला मिळत आहे. यामध्ये ARRI LogC3 Curve, ARRI Wide Gamut 3 आणि 10-bit कलर डेप्थ सपोर्ट देखील पाहायला मिळत आहे. डिव्हाईसमध्ये दिलेल्या ARRI सिनेमा मोडच्या मदतीने 4K 60fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. यामध्ये 14 प्रीसेट एआरआरआय लुक्स आणि एआरआरआय लुक लायब्ररी मधील 87 क्रिएटिव्ह कलर ग्रेडिंग पर्यायांचाही समावेश आहे.
कॅमेरा
फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो 1/1.28-इंच सेंसर आणि ओआयएस सपोर्टने सुसज्ज आहे. यामध्ये 200MP चा टेलीफोटो कॅमेरा आणि 50MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील मिळणार आहे. तसेच स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फीसाठी 55MP चा फ्रंट कॅमेरा देखील मिळणार आहे.
डिस्प्ले
हॉनर मॅजिक9 प्रो मॅक्स मध्ये 6.8 इंच एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले मिळणार आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. डिव्हाईसची पीक ब्राइटनेस 10,000 निट्सपर्यंत वाढवले जाऊ शकते. तर परफॉर्मंससाठी या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 प्रोसेसर मिळणार आहे. यासोबतच यामध्ये हॉनर इमेजिंग चिप एच1 देखील मिळणार आहे.
बॅटरी
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 100W वायर्ड आणि 80W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी मिळणार आहे. फोनमध्ये मॅजिक ओएस 11 मिळणार आहे, जो अँड्रॉईड 17 वर आधारित आहे. डिव्हाईसमध्ये गूगल जेमिनी आणि एआय बटन यांसारखे फीचर्स देखील मिळणार आहेत.