अखेर तो क्षण आलाच! नव्या स्मार्टफोनसह Infinix चा भारतात धमाका; पावरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे खास फीचर्स
WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या
Infinix Note 60 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंची किंमत 31,999 रुपये ठेवण्यत आली आहे. तर 8GB + 256GB हे व्हेरिअंट 34,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही खास बँक ऑफर्स देखील देत आहे. ग्राहक एसबीआय, आयसीआयसीआय बँक, येस बँक, बँक ऑफ बडोदा आणि आयडीएफसी बँकेच्या कार्डांवर 3,000 रुपयांपर्यंतची त्वरित सूट मिळवू शकतात. तसेच 12 महिन्यांपर्यंत ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळणार आहे. स्मार्टफोनची विक्री 20 एप्रिलपासून सुरु होणार आहे. ग्राहक फ्लिपकार्ट आणि इन्फिनिक्सच्या ऑनलाईन स्टोअरवरून स्मार्टफोन खरेदी करू शकतात. Infinix Note 60 Pro डीप ओशन ब्लू, मोचा ब्राऊन आणि सोलर ऑरेंज रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Infinix)
डिव्हाईसमध्ये 6.78-इंच 1.5K (1,208×2,644 पिक्सेल) एलटीपीएस अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हे डिव्हाईस 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. तसेच या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. या डिव्हाइसमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 7i चे संरक्षण देखील आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP64 रेटिंग आहे.
नव्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने क्वालकॉमचा 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 चिपसेट दिला आहे. डिव्हाईसमध्ये अॅड्रेनो ए 810 जीपीयू, 8 जीबी एलपीडीडीआर 5 रॅम, आणि 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम एक्सपेंशन देखील मिळणार आहे. या फोनमध्ये 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देखील मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी कंपनीने त्यांच्या नव्या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.59) चा प्रायमरी कॅमेरा समाविष्ट आहे. या डिव्हाईसमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS), 78-डिग्रीचा फील्ड ऑफ व्यू आणि ऑटोफोकसची सुविधा देखील ऑफर करत आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील दिला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 13-मेगापिक्सेल (f/2.2) चा फ्रंट कॅमेरा आहे.
याशिवाय लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये कंपनीने 90W वायर्ड आणि 30W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे.






