Nubia च्या नव्या गेमिंग फोनची धडाकेबाज एंट्री! फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल... किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी
Tech Tips: उन्हाळ्यात AC 18°C वर चालवताय? थांबा, तज्ज्ञांनी सांगितलं परफेक्ट टेंपरेचर
स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Nubia Neo 5 Pro दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 128GB आणि 12GB + 256GB यांचा समावेश आहे. Nubia Neo 5 Pro च्या 12GB + 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत PHP 14,999 म्हणजेच सुमारे 24 हजार रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत PHP 17,999 म्हणजेच सुमारे 28 हजार रुपये आहे. (फोटो सौजन्य – Nubia)
Nubia ने लाँच केलेल्या नव्या गेमिंग स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये गेमिंग आणि व्हिडीओचा अनुभव अधिक स्मूथ असणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर दिला आहे. याशिवाय कंपनीच्या या नव्या स्मर्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज देखील दिले आहे. ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंगस अधिक चांगले होते.
गेमिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये खास शोल्डर ट्रिगर्स दिले आहेत. ज्यामुळे गेमिंगदरम्या अधिक चांगला कंट्रोल ऑफर करतो. याशिवाय मॅजिक टच 3.0 टेक्नोलॉजी स्क्रीनचे रिस्पॉन्सिवनेस अधिक चांगले बनवतो. तसेच AI बेस्ड एंटी-मिस्टच सिस्टम एक्सीडेंटल टच कमी करतो, तर झेड-अक्षीय लिनियर मोटर अधिक चांगला हॅप्टिक फीडबॅक देते.
गेमिंगसोबतच यूजर्सना फोटोग्राफीचा देखील अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी फोनममध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये 2MP चा सेकेंडरी सेंसर देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,210mAh बॅटरी मिळणार आहे.






