सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे
डिजिटल वापर वाढत असताना त्यासोबतचे धोकेही वाढत आहेत. नागरिकांची ओळख असलेले मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि छायाचित्रे सायबर विश्वात विकली जात आहेत. विमा आणि कर्जविक्री करणाऱ्या कंपन्यांपासून सायबर गुन्हेगारांपर्यंत अनेकजण ही माहिती खरेदी करून नागरिकांचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक नुकसान करत आहेत. मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अवघ्या ५ रुपयांना, तर पडताळणी केलेला आधार क्रमांक ५०० ते ८०० रुपयांना तृतीय पक्षाच्या एजंटकडून खरेदी केला जात असल्याचे तपासात आढळले. (फोटो सौजन्य: Pinterest)
अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी योग्य ती खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या मोबाईलवर कोणतेही ॲप्स अधिकृत प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा आणि तुमचे कॉन्टॅक्ट्स, गॅलरी, लोकेशन, मेसेजेस, मायक्रोफोन आणि कॅमेरा यांना अनावश्यक परवानग्या देणे टाळा.
सायबर सुरक्षा विभागाने आधारचा सुरक्षित वापर करण्याचे आवाहन केले आहे. अलीकडे आधार अद्ययावत करताना सरकारी योजनांसाठी अर्ज करताना किवा सिमकार्ड खरेदी करताना तृतीय पक्षाच्या एजंटकडून आधारचा गैरवापर करून गुन्हे केल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडीसोबत नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र जोडले गेल्यास सायबर भामटे बँक, डिजिटल वॉलेट, विमा आणि अन्य सेवांच्या केवायसी प्रक्रियेत फसवणूक करू शकतात. तसेच सिमकार्डची अदलाबदल करून किंवा विश्वासार्ह वाटणारे फोन करून नागरिकांना गंडा घालू शकतात. कर्ज, विमा, चलन, केवायसी, परतावा किंवा सरकारी योजनांच्या नावे लिंकद्वारे नागरिकांचे ओटीपी, बँक खात्याची माहितीही चोरली जाते.






