

गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन ईव्हेंटमध्ये टेक कंपनी OnePlus ने त्यांचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 15 ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला होता. या ईव्हेंटच्या शेवटी कंपनीने वनप्लस 15R स्मार्टफोन टीझ केला होता. आता कंपनीने आगामी वनप्लस 15R स्मार्टफोनची पहिली झलक शेअर केली आहे. कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोनचा पहिला फोटो शेअर केला असून या डिव्हाईसची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. कंपनीने शेअर केलेल्या नवीन टिझरमध्ये 'पावर ऑन लिमिट्स ऑफ' अशी टॅगलाईन लिहीली आहे. या टिझरमध्ये कंपनीचा आगामी 15R स्मार्टफोन ब्लॅक आणि ग्रीन या दोन रंगाच्या मेटल फ्रेममध्ये पाहायला मिळत आहे. फोनच्या फोटोमध्ये डाव्या बाजूला प्लस बटण देखील दिसत आहे.
कंपनीने शेअर केलेला फोटा बारकाईने पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, या आगामी स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरे दिले जाणार आहेत. तर वनप्लस 13R मध्ये ट्रिपल कॅमेरे देण्यात आले होते. कॅमेऱ्याच्या बाजूला एक एलईडी फ्लॅश देखील पाहायला मिळत आहे. वनप्लसने कन्फर्म केलं आहे की, हा फोन आउट ऑफ बॉक्स अँड्रॉइड 16-बेस्ड ऑक्सीजनओएस 16 वर आधारित असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्ट्सवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, अपकमिंग वनप्लस 15R मध्ये 6.83-इंचाचा 1.5K 165Hz AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच या फोनला अधिक शक्तिशाली करण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट किंवा स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 5 चिपसेट दिला जाऊ शकतो.
याशिवाय कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर, 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकेंडरी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 100W किंवा 120W ची SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन 7800mAh किंवा 8000mAh बॅटरीने सुसज्ज असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, कंपनीचा हा स्मार्टफोन डिसेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. वनप्लस 15R ची विक्री Amazon.in व्यतिरिक्त वनप्लस इंडियाचे ऑनलाइन स्टोर आणि ऑफलाइन स्टोर्सवर देखील होणार आहे. येणाऱ्या काही दिवसांत कंपनी स्मार्टफोनची लाँच डेट आणि इतर डिटेल्स शेअर करण्याची शक्यता आहे.
Que: OnePlus फोन गरम होतात का?
Ans: जड गेमिंग किंवा उष्ण वातावरणात थोडे गरम होऊ शकतात, पण कूलिंग सिस्टीम चांगली असते.
Que: OnePlus चे स्मार्टवॉच / इयरबड्स उपलब्ध आहेत का?
Ans: होय, OnePlus Watch, OnePlus Buds, Buds Pro, Bullets इत्यादी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत.
Que: OnePlus फोन वॉटरप्रूफ आहेत का?
Ans: फ्लॅगशिप मॉडेल्सना IP68 रेटिंग असते, पण सर्व Nord मॉडेल्स वॉटरप्रूफ नसतात.