ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
OpenAI ने AI चॅटबोट ChatGPT मध्ये एक नवीन फीचर जोडलं आहे. कंपनीने आता चॅटजीपीमध्ये ग्रुप चॅटिंग फीचरचा समावेश केला आहे. हे फीचर यूजर्सना व्हॉट्सअॅपप्रमाणेच आता चॅटजीपीटीवर देखील ग्रुप चॅटचा वापर करण्याची संधी देणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने यूजर्सना शेयर्ड स्पेस बनवण्यासाठी मदत मिळणार आहे, जिथे यूजर्स त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना, कुटूंबियांना, सहकाऱ्यांना आणि इतरांना जोडू शकणार आहेत. जिथे सर्वजण एकाच ठिकाणी एकमेकांसोबत संवाद साधू शकणार आहेत. ज्याप्रमाणे WhatsApp मध्ये ग्रुप चॅट फीचर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे यूजर्स आता ChatGPT मध्ये देखील शेयर्ड स्पेस तयार करून तिथे इतर यूजर्सना आमंत्रित करू शकणार आहेत आणि एकमेकांसोबत संवाद साधू शकणार आहेत.
यामध्ये तुम्हाला चॅटजीपीटीच्या AI चॅटबोटची देखील मदत मिळणार आहे. जसे की तुम्हाला संध्याकाळी एखाद्या शहरात फिरायला किंवा खायला जायचे असेल तर तुम्ही चॅटजीपीटीच्या मदतीने ठिकाण किंवा रेस्टॉरंट निवडू शकणार आहात. हा मेसेज आणि प्लॅनिंग तुमचे मित्र, फॅमिली किंवा सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही चॅटजीपीटीच्या ग्रुप चॅटिंग फीचरचा वापर करू शकता. सध्या हे फीचर फ्री, गो प्लस आणि प्रो वर्जनसाठी लाँच करण्यात आले आहे. हे फीचर वेब आणि अॅप वर्जन अशा दोन्हींसाठी लाँच करण्यात आले आले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही जास्तीत जास्त 20 लोकांना चॅटजीपीटीच्या ग्रुप चॅटचे आमंत्रण पाठवू शकता. पण यासाठी सर्वात आधी तुम्हाला एक ग्रुप क्रिएट करावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, कुटूंबियांना, सहकाऱ्यांना आणि इतरांना या ग्रुप चॅटमध्ये अॅड होण्यासाठी आमंत्रण पाठवू शकणार आहात. तुम्हाला प्रॉम्प्टचा वापर करून ग्रुप क्रिएट करावा लागणार आहे आणि त्यामध्ये ग्रुप मेंबर्सना जोडावे लागणार आहे. याशिवाय तुम्ही फोटोचा वापर देखील करू शकता, जसे व्हॉट्सअॅपमध्ये एखाद्या ग्रुपसाठी केले जाते.
चॅटजीपीटीच्या विंडोवर टॉप राइटला यूजर्सना एक माणसासारखा आयकॉन दिसणार आहे. या आयकॉनचा वापर करून यूजर्स चॅट करू शकतात आणि इतर यूजर्सना ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण पाठवू शकतात. साइडबारमध्ये, तुम्ही जोडलेले सर्व सदस्य तुम्हाला दिसतील, मग ते 20 असोत किंवा त्यापेक्षा कमी.
चॅटजीपीटी यूजर्सकडे असणारा सर्वात बेसिक अधिकार म्हणजे यूजर्स पाहिजे तेव्हा चॅटमधून बाहेर पडू शकतात आणि त्यांची इच्छा असल्यास ते इतरांना काढून टाकू शकतात. मात्र ज्या यूजरने ग्रुप तयार केला आहे, त्याला काढून टाकू शकत नाही.
Ans: ChatGPT हे OpenAI ने विकसित केलेले AI चॅटबॉट मॉडेल आहे, जे मानवांसारखे उत्तर देणे, माहिती देणे, कंटेंट तयार करणे आणि संवाद साधणे यासाठी वापरले जाते.
Ans: हे मोठ्या language models वर आधारित असून इंटरनेटवरील विशाल डेटाने ट्रेन केलेले आहे. वापरकर्त्याने विचारलेल्या प्रश्नानुसार सर्वात अचूक आणि संदर्भासह उत्तर तयार करते.
Ans: होय, ChatGPT चा बेसिक व्हर्जन मोफत उपलब्ध आहे.






