X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अॅक्सेस
एलन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने प्रायव्हसी सेंट्रिक मेसेजिंग सर्विस XChat लाँच केले आहे. मस्कने या नव्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मबाबत आधीच अपडेट शेअर करण्यास सुरुवात केली होती. आता अखेर हे प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहे. मस्कने घोषणा केली आहे की, हे नवीन प्लॅटफॉर्म सध्या iOS आणि वेब प्लॅटफॉर्मसाठी लाईव्ह करण्यात आले आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, लवकरच ही सर्विस अँड्रॉईड यूजर्ससाठी देखील उपलब्ध केली जाणार आहे. हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म थेट मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपला टक्कर देणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हे प्लॅटफॉर्म युजर्सची प्रायव्हसी लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आलं आहे.
या अॅपबाबत X ने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, XChat आता iOS आणि वेबसाठी रोलआऊट करण्यात आलं आहे. अॅडव्हांस फीचर्स केवळ प्रिमियम यूजर्ससाठी उपलब्ध आहेत. लवकरच अँड्रॉईड युजर्ससाठी हे प्लॅटफॉर्म लाँच केलं जाणार आहे, याची तयारी देखील सुरु झाली आहे. यूजर्सना एक्समध्ये Chat आणि DM एकाच इनबॉक्समध्ये दिसणार आहे. जर तुम्हाला हे अपडेट दिसत नसेल तर एक्स अॅप अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. XChat आता सर्व X यूजर्ससाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एलन मस्कने जून महिन्यात या मेसेजिंग प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली होती. मस्कने सांगितलं होतं की, XChat यूजर्सची सिक्योरिटी आणि प्रायव्हसी लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आलं आहे. मस्कचं म्हणणं आहे की, लेटेस्ट नवीन XChat एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, वॅनिशिंग मेसेजेज आणि कोणत्याही प्रकारची फाईल शेअर करण्याच्या कॅपिसिटीसह रिलीज करण्यात आलं आहे. यासोबतच यूजर्स ऑडियो आणि व्हिडीओ कॉलिंग देखील करू शकणार आहेत. हे प्लॅटफॉर्म Rust वर आधारित आहे आणि यामध्ये (Bitcoin स्टाइल) एन्क्रिप्शनचा वापर करण्यात आला आहे, जे पूर्णपणे नवीन आर्किटेक्चर सिस्टम आहे.
Rust आर्किटेक्चर सिस्टममुळे XChat मेसेजिंग प्लॅटफॉर्म इतर अॅपपेक्षा वेगळे बनते, जे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हे अत्यंत वेगवान आणि सुरक्षित मानले जाते. यामध्ये वापरण्यात आलेली एन्क्रिप्शन टेक्नोलॉजी Bitcoin प्रोटोकॉल सारखी आहे, ज्यामुळे यूजर्सच्या डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेचे रक्षण करते.
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन: या फीचरमुळे यूजर्सचे चॅट पूर्णपणे सुरक्षित राहतात.
वॅनिशिंग मेसेजेज: मेसेज एका ठरावीक वेळेनंतर आपोआप गायब होतात. यूजर्स या फीचरचा वापर करण्यासाठी टाइमर सेट करू शकतात.
फाइल शेयरिंग: हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म कोणत्याही प्रकारच्या फाईल्स शेअर करू शकता.
ऑडियो आणि व्हिडीओ कॉलिंग: यूजर्स फोन नंबरशिवाय कॉलिंग करू शकतात.
Ans: विशिष्ट विषयाशी संबंधित जास्तीत जास्त पोस्ट झाल्यावर त्या टॉपिक्स ट्रेंडमध्ये दिसतात.
Ans: त्यांच्या प्रोफाइलवर जाऊन "Block" पर्याय निवडा.
Ans: Two-Factor Authentication (2FA) सुरू करा, मजबूत पासवर्ड वापरा आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणं टाळा.






