Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष... इतकी आहे किंमत
सिंगापूरमध्ये हा स्मार्टफोन S$279 म्हणजेच सुमारे 19 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्राऊन आणि पर्पल रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. ब्राउन व्हेरिअंटमध्ये ‘व्हीगन लेदर’ फिनिश देण्यात आले आहे. शाओमीने भारत आणि इतर बाजारपेठांसाठी याची किंमत व लाँचची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Redmi )
रेडमीच्या नवीन स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये 6.9 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 1600×720 पिक्सेल आहे. या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. याची नॉर्मल ब्राइटनेस 660 निट्स आणि HBM मोडमध्ये 810 निट्सपर्यंत आहे. या स्मार्टफोनला डोळ्यांच्या सुरक्षेसाठी डीसी डिमिंग आणि TÜV Rheinland सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे.
परफॉर्मंससाठी नव्या रेडमी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 64GB आणि128GB स्टोरेज ऑप्शन देखील मिळणार आहे. फोनमध्ये मेमोरी एक्सपेंशनद्वारे रॅम 8GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. तर मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचे अपर्चर f/1.8 आहे. फोनमध्ये एक सेकेंडरी लेंस देखील आहे. फोनच्या कॅमेऱ्यात HDR, नाइट मोड आणि पोर्ट्रेट मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, 30fps वर 1080p पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाऊ शकते. स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर समोरील बाजूला देखील एचडीआर, पोर्ट्रेट आणि नाइट मोडसह सॉफ्ट-लाइट रिंग मिळणार आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. बॉक्समध्ये कंपनी 15W चार्जर देणार आहे.






