15 हजारांहून कमी किंमतीत नवा Redmi स्मार्टफोन लाँच! दमदार बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले करणार कमाल, डिझाईन एकदा पाहाच
Redmi A7 Pro 5G स्मार्टफोन 2 स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 64GB आणि 128GB यांचा समावेश आहे. डिव्हाईसच्या 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11,499 रुपये आहे. तसेच या डिव्हाईसच्या 128GB व्हेरिअंटची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, मिस्ट ब्लू आणि सनसेट ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकणार आहेत. फोनची विक्री 15 एप्रिल रोजी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरवर सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – Redmi)
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Redmi च्या नव्या हँडसेटमध्ये 6.9-इंच HD+ LCD स्क्रीन दिली आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या रेडमी डिव्हाईसमध्ये 800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये
अँड्रॉईड 16-बेस्ड हायपर ओएस 3 दिला आहे. कंपनीने दावा केला आहे की, या स्मार्टफोनला 4 वर्षांपर्यंत अँड्रॉईड आणि 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी पॅच मिळणार आहे. परफॉर्मंससाठी या डिव्हाईसमध्ये 6nm ऑक्टा-कोर युनिसॉक T8300 प्रोसेसर दिला आहे. तसेच कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देखील मिळणार आहे. हँडसेटमध्ये जेमिनी आणि गुगलचे सर्कल टू सर्चसारखे काही AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
फोटोग्राफीसाठी, या डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये f/2.0 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा आहे. समोरच्या बाजूला, फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह मोठी 6,300mAh बॅटरी आहे.






