Xiaomi Fan Festival: ग्राहकांनोsss घाई करा! स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी, अशा आहेत ऑफर्स
शाओमी फॅन फेस्टिवलमध्ये यूजर्सना अॅप-ओनली कूपन मिळणार आहे, ज्याच्या मदतीने ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्ट टिव्हीवर डिस्काऊंट मिळणार आहे. इंस्टंट बँक डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनसमुळे मिड-रेंज फोन सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचले आहे. तुम्हाला देखील मिड-रेंज किंमतीत उपलब्ध असणारे स्मार्टफोन्स खरेदी करायचे असतील तर शाओमी फॅन फेस्टिवल तुमच्यासाठी देखील फायद्याचा ठरणार आहे. यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करू शकणार आहेत. कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हीच योग्य वेळ आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही स्वस्त स्मार्टफोनच्या शोधात असाल तर रेडमी फॅन फेस्टिवलमध्ये अनेक स्मार्टफोन्स 10 हजारांहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत. तर ज्यांचे बजेट थोडे जास्त आहे, त्यांच्यासाठी 15,000 रुपयांच्या कॅटेगरीमध्ये देखील दमदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. यामधील अनेक स्मार्टफोन्स हाय-रिफ्रेश रेट आणि फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज आहेत. हे फीचर्स यापूर्वी केवळ महागड्या फ्लॅगशिप मॉडेल्समध्ये उपलब्ध होते. मात्र आता कंपन्या बजेट आणि मिड रेंज सेगमेंटमधील स्मार्टफोनमध्ये देखील हे फीचर्स ऑफर्स करतात.
तसेच 20 हजार रुपयांच्या रेंजमध्ये देखील आता प्रीमियम कॅमेरा आणि 5G कनेक्टिविटी असलेले चांगले पर्याय उपलब्ध आहेत. या सेलदरम्यान शाओमीच्या स्मार्ट टिव्ही देखील ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहे. ग्राहक जुने हार्डवेयर एक्सचेंज करून हजारो रुपयांची बचत देखील करू शकणार आहेत. ज्यामुळे लेटेस्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्याची संधी मिळणार आहे आणि अत्यंत कमी किंमतीत ग्राहकांना चांगला अनुभव देखील मिळणार आहे.
कंपनी अनेक प्रोडक्ट्सच्या खरेदीवर ग्राहकांना सुमारे 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट बँक डिस्काऊंट देखील देत आहे. अधिक जास्त बचत करण्यासाठी यूजर्स क्रेडिट कार्ड ऑफर्सचा फायदा घेऊ शकणार आहेत. काही प्लॅटफॉर्म्स यादरम्यान खरेदीवर ग्राहकांना एक्स्ट्रा लॉयल्टी पॉइंट्स देखील देत आहे. या सर्व ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही संपूर्ण व्हॅल्यू वसूल करू शकणार आहेत. शाओमी फॅन फेस्टिवल 15 एप्रिल रोजी रात्री अधिकृतपणे संपणार आहे. शेवटच्या क्षणी होणारा विलंब टाळण्यासाठी, तुमच्या जुन्या डिव्हाइसची किंमत आधीच तपासा. सेल संपल्यानंतर या प्रीमियम गॅजेट्सच्या किमती पुन्हा वाढू शकतात. स्टॉक संपण्यापूर्वी आजच तुमचे आवडते शाओमी किंवा रेडमी डिव्हाइस खरेदी करा.






