काहीही क्लिक न करताच होऊ शकतात 'हे' फोन हॅक; Android वरून होतंय शक्य
नवी दिल्ली : सध्या Samsung, Realme, Oppo, Vivo यांसारखे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या सुविधेसाठी कंपन्यांकडून अनेक फीचर्स आणले जात आहेत. त्यातच जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा टॅब्लेट वापरत असाल, तर तुम्हाला आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण, CERT-In ने एक गंभीर इशारा जारी केला आहे. CERT-In काही अँड्राईड फोन अगदी सहज हॅक होऊ शकतात, असे म्हटले आहे.
काही अँड्राईडमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे फोन हॅक होण्याची जास्त शक्यता आहे. त्यात ही समस्या Android 14, Android 15, Android 16 आणि Android 16 QPR2 मध्ये आढळून आली आहे. म्हणजेच ज्या स्मार्टफोनमध्ये हे अँड्राईड आहेत त्यांना फटका बसू शकतो. यामध्ये Vivo, OnePlus, iQOO, Xiaomi, Realme, Motorola, Samsung, Oppo आणि Google Pixel सारख्या ब्रँड्सच्या डिव्हाईसेसचा समावेश आहे.
हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊन लिंकवर क्लिक न करताही डिव्हाईसेसवर हल्ला करू शकतात. ते तुमच्या फोनवर धोकादायक कोड चालवू शकतात, सिस्टम क्रॅश करू शकतात किंवा तुमची वैयक्तिक माहिती मिळवू शकतात. इतकेच नाही, तर हॅकर्स तुमच्या फोनमध्ये प्रवेश मिळवून तुमचा डेटा चोरू शकतात किंवा डिव्हाइसवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकतात.
धोका टाळण्यासाठी काय करावं?
धोका टाळण्यासाठी तुम्ही अनेक महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत. सर्वप्रथम, तुमचा फोन अपडेट ठेवा, कारण कंपन्या वेळोवेळी सुरक्षा पॅचेस जारी करतात. सेटिंग्जमध्ये सिस्टीम अपडेट्स नक्की तपासा आणि उपलब्ध असलेले कोणतेही अपडेट्स त्वरित इन्स्टॉल करा. ॲप्स डाउनलोड करताना, फक्त गूगल प्ले स्टोअरचा वापर करा, कारण थर्ड-पार्टी ॲप स्टोअर्समध्ये धोकादायक ॲप्स असू शकतात.
आता WhatsApp मधून होणार कमाई
जर तुम्ही व्हॉट्सॲपवर सक्रिय असाल आणि स्वतःचे चॅनेल सुरू करण्याचा विचार करत असाल, तर येणारा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. व्हॉट्सॲप लवकरच एक विशेष फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्याद्वारे चॅनेल क्रिएटर्सना थेट कमाई करता येईल. आता केवळ फॉलोअर्स वाढवण्यापुरते मर्यादित न राहता, तुमच्या दर्जेदार कंटेंटचे पैशात रूपांतर करणे शक्य होणार आहे.






